Rubina Dilaik : रुबिना दिलैकचा प्रेग्नेंसीत हार्ड वर्क; व्यायामाचा video व्हायरल
पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही मालिकांमध्ये भारदस्त अभिनय साकारणारी अभिनेत्री रुबिना दिलैक ( Rubina Dilaik ) तिच्या प्रेंग्नसीमुळे चर्चेत आली आहे. लवकरच रुबिना आई होणार आहे. याच दरम्यान रुबिनाचा हार्ड वर्कींग (न्यायाम) करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला आहे. प्रेंग्नसीत हार्ट व्यायाम केल्याने युजर्सनी कॉमेन्टसचा पाऊस पाडलाय.
संबधित बातम्या
अभिनेत्री रुबिना दिलैकने ( Rubina Dilaik ) तिच्या इंन्स्टाग्रामवर नुकताच व्यायाम करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात रूबिनाने हार्ड असणारा स्क्वॉट व्यायामाचा प्रकार करताना दिसतेय. याशिवाय ती वेगवेगळे व्यायामाचे प्रकार करतानाही दिसतेय. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने 'ती बलवान आहे, ती अजिंक्य आहे, ती कोण आहे?. ती तूच आहेस….. आणि मला तिचा अभिमान आहे❤️'. असे लिहिले आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिच्या काळजीपोटी भरभरून कॉमेन्टस् केल्या आहेत. इतका हार्ड व्यायाम रुबिना कशी करू शकते?, असला व्यायाम कशाला करायचा?, या काळात हा व्यायाम तिने करायला नको पाहिजे, परंतु, ती एक बनवान स्त्री आहे. यासारख्या अनेक कॉमेन्टस तिने केल्या आहेत. या व्हिडिओला आतापर्यत २ लाख ३८ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.
हेही वाचा :

