Latest

Nargis Fakhri HBD special : नर्गिसच्या वाढदिसानिमित्त जाणून घ्या ‘या’ खास गोष्टी

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : नर्गिस फाखरी या जबरदस्त अभिनेत्रीने नेहमीच आपल्या विविध भूमिकांनी आणि अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. 'रॉकस्टार', 'मद्रास कॅफे' आणि 'मैं तेरा हिरो' सारख्या बॉलिवूड चित्रपटांमधील अभिनयाने तिने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. ( Nargis Fakhri HBD special ) तिच्या ४४ व्या वाढदिसानिमित्त तिच्या मनोरंजन जगात तिच्या उल्लेखनीय प्रवासाची एक झलक.

संबंधित बातम्या  

२०१५ च्या कॉमेडी स्पायमध्ये काम करून नर्गिस फाखरीने हॉलिवूडमध्येही प्रवेश केला आहे. या स्टार-स्टडेड चित्रपटात तिला मेलिसा मॅककार्थी, जेसन स्टॅथम, रोझ बायर्न आणि ज्यूड लॉ यासारख्या ए-लिस्टर्ससोबत दाखविले. नर्गिसने 'लिया' या गुप्तहेराची भूमिका साकारली आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला. जागतिक स्तरावर तिचे स्थान आणखी मजबूत केले.

तिच्या व्यावसायिक कामगिरीच्या पलीकडे नर्गिस तिच्या धाडसी आणि स्पष्ट वक्ते व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते. ती निर्भयपणे निरनिराळ्या विषयांवर आपली मते व्यक्त करत असते. तिचा फॅशन सेन्स कमाल असून ती अनेकांसाठी एक स्टाईल आयकॉन बनते. नर्गिस 'तत्लुबाज' या मालिकेद्वारे ओटीटी मनोरंजनाच्या जगात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. ( Nargis Fakhri HBD special )

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT