Latest

Jiya Shankar : वेड फेम जिया शंकर लालबागच्या राजाच्या चरणी लीन

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री जिया शंकरने 'वेड' चित्रपटातीलव भारदस्त भूमिकेने चाहत्यांचे मनोरंजन केलं आहे. अभिनयासोबत जिया ( Jiya Shankar ) तिच्या नवनविन फॅशननेदेखील सर्वाचे लक्ष वेधून घेत असते. दरम्यान नुकतेच जियाने मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतलं आहे. यावेळच्या तिच्या वेशभूषेचे चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं आहे.

संबधित बातम्या 

गणेश चतुर्थी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. नुकतेच घरगुती गणपतीचे विसर्जन झाले अजून सार्वजनिक मंडळाचे गणपतीचे पूजन करण्यात येत आहे. दरम्यान सामान्यसोबत अनेक बॉलिवूड आणि मराठी कलाकारदेखील गणपतीच्या दर्शन घेवून आशीर्वाद घेत आहेत. श्रेयस तळपदे, शर्लिन चोप्रा, आयुष्यमान खुराना यासारखे अनेक स्टार्संनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतलंय. याच दरम्यान क्यूट अभिनेत्री जिया शंकरने ( Jiya Shankar ) लालबागच्या राजाचे दर्शन घेवून आशीर्वाद घेतले आहेत.

जियाने घालतेल्या व्हाईट अनारकली ड्रेस सर्वांनी कौतुक केलं. दर्शन घेवून परताना जियावर पॉपाराझीच्या कॅमेऱ्याची नजर पडली. यावेळी त्यांनी जियासोबत खूपच गप्पागोष्टी केल्या. जियाने हसत- हसत सर्व प्रश्नाची उत्तरे दिली. जिया व्हाईट ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत होती. यावेळचा व्हिडिओ विरल भयानी इन्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी तिच्या लूकचे भरभरून कौतुक करताना कॉमेन्टचा पाऊस पाडलाय.

हेही वाचा : 

(viral : viralbhayani instagram वरून साभार)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT