Janhvi Kapoor  
Latest

Janhvi Kapoor : जलपरी❤️?; जान्हवी ब्ल्यू वनपीसमध्ये ट्रोल (video)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ( Janhvi Kapoor) तिच्या आगामी 'मिली' चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची कन्या जान्हवीला चित्रपटात पाहण्यासाठी प्रेक्षकांना आतुरतेने वाट पाहत होते. याच दरम्यान जान्हवीच्या मिनी या चित्रपट बॉक्स ऑफीसवर सज्ज झाल्याने चाहत्यांची क्रेझ वाढली. जान्हवी अभिनयासोबत तिच्या हॉट फॅशनने चाहत्यांना भूरळ घालत असते. सध्या जान्हवीचा आणखी धमाकेदार फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) तिच्या इंन्स्टाग्रामवर फाल्गुनी आणि शेन पिकॉक यांनी डिझाईन केलेल्या ऑफ शोल्डर ब्ल्यू स्पार्कली वनपीसमधील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केलं आहेत. या जान्हवीची कर्वी फिगर दिसत असून ती यात कपड्यात हॉट आणि ग्लॅमरस दिसतेय. यातील खास म्हणजे, जान्हवीच्या ड्रेसच्या बाह्या हातांच्या बोटापर्यंत आहेत. यात तिने ड्रेसच्या कलरचे हँड ग्लोज परिधान केल्याचे दिसतेय. या फोटोला जान्हवीने 'the vision was Botticellis Venus meets The Little Mermaid ??‍♀️'. असे तर व्हिडिओला 'enjoyed this moment ✨ thank you @elleindia for naming me "Mould-Breaker Of The Year" ? sounds cute ??'. असे लिहिले आहे.

मोकळे केसांची स्टाईल, हातात अंगठी, कानात छोटे इअररिग्स, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊटला हिंदी गाण्याचे बोल वाजत आहे. यात जान्हवीने किलर पोझ दिली असून तिच्या प्रत्येक मनमोहक अंदांनी दिवाने केलं आहे. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव तिच्यावर केला आहे. यात एका युजर्सने 'Awwww ?', 'Mermaid ?', 'Oo wow Janhvi Ji what a new look ?✌️', '❤️❤️❤️???? stunning !!!', 'So sooooo So good looking', 'Gorgeous ?', 'Awsmmmm ❤️❤️❤️❤️', 'Wow', 'Beautiful ?', 'Wow❤️'.यासारख्या कमेन्टस केल्या आहेत.

तर काही नेटकऱ्यांना जान्हवीचा हा व्हिडिओ अजिबात आवडलेला नाही. त्यांनी 'तिची स्टायलिस्ट कायली जेनरची फॅन असावी', 'जरा उंचीला असतीस तर ड्रेस लोळला नसता', 'सर्जरी केली आहे काय?' यासारखे प्रश्न विचारत ट्रोल केलं आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यत जवळपास ७ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT