Ayushmann Khurrana 
Latest

Ayushmann Khurrana : आयुष्मानला क्रिकेटचे वेड; अंडर-१९ जिल्हास्तरीय क्रिकेटमध्ये सहभागी

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषकादरम्यान बॉलिवूड स्टार आयुष्मान खुरानाचे ( Ayushmann Khurrana ) सोशल मीडियावरील क्रिकेट कौशल्य आणि आवडीविषयीची खुलासा केला आहे. टूर्नामेंट दरम्यान आयुष्मान जगभरातील अनेक क्रिकेट चाहत्यांशी कनेक्ट झाला आणि या खेळाबद्दलची महत्व सांगितले. हा मुद्दा सोशल मीडियावर खूपच चर्चेचा विषय बनला आहे.

संबंधित बातम्या 

आयुष्मान ( Ayushmann Khurrana ) त्याच्या क्रिकेटच्या आवडीबद्दल अधिक खुलासा करत म्हणाला की, 'मी फक्त क्रिकेटचा मोठा चाहताच नाही कारण अनेकांना हे माहित नाही पण मी प्रत्यक्षात अंडर-१९ जिल्हास्तरीय क्रिकेट खेळलो आहे. हा एक खेळ आहे जो, मला खरोखर आवडतो आणि खूप उत्कटतेने फॉलो करतो. जर माझा मनोरंजनाचा कल नसता तर मी क्रिकेटर होण्याचा मी गांभीर्याने विचार केला असता.

यापुढे तो म्हणतो की, 'जेव्हा- जेव्हा मला संधी मिळते तेव्हा मी भारताचा क्रिकेट खेळ पाहण्यासाठी माझा दिवस मोकळा ठेवतो. जेव्हा भारत खेळत नाही तेव्हा मी इतर मनोरंजक सामने देखील फॉलो करतो. हा विश्वचषक शक्य तितका मनोरंजक असावा अशी माझी इच्छा आहे. क्रिकेट आणि टीम इंडियाच्या बाबतीत तुम्ही मला वेडसर म्हणू शकता.'

'या विश्वचषकात मला फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील क्रिकेटप्रेमींशी या खेळाबद्दल आणि क्रिकेटच्या खेळपट्टीवर ॲक्शन बद्दलची चर्चा करायची होती!. मला आनंद आहे की, लोकांना माझे ट्विट आकर्षक आणि संबंधित वाटत आहेत. जगात क्रिकेटचे प्रचंड चाहते आहेत आणि खेळ सुरू असताना माझे विचार मांडण्यात मला खूप आनंद होत आहे!' असेही त्याने म्हटलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT