Latest

Arun Bali Passes Away | ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे मुंबईत निधन

दीपक दि. भांदिगरे

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी मुंबईत (Arun Bali Passes Away) निधन झाले. त्यांनी आज पहाटे ४.३० वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या ३ इडियट्स, पीके, केदारनाथ, जमीन और सौगंध सारख्या चित्रपटांत प्रामुख्याने भूमिका केल्या होत्या.

अरुण बाली न्यूरोमस्कूलर नावाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून उपचार सुरु होते. अरुण बाली यांच्या मुलाने सांगितले होते की त्याचे वडील Myasthenia Gravis नावाच्या आजाराने त्रस्त होते. या आजारामुळे नसा आणि स्नायू यांच्यामध्ये अडथळा निर्माण होतो.

अरुण बाली यांचे करियर

अरुण बाली यांचा जन्म पंजाबमधील जालंधर येथे १९४२ रोजी झाला होता. अरुण यांनी राजू बन गया जेंटलमॅन, खलनायक, फूल और अंगारे, आ गले लग जा, पुलिसवाला गुंडा, सबसे बडा खिलाड़ी, सत्या, हे राम, ओम जय जगदीश, लगे रहो मुन्ना भाई, बर्फी, एयरलिफ्ट, रेडी, बागी २, केदरनाक आणि पाणी चित्रपटांमध्ये काम केले आहे. आमिर खान स्टारर लाल सिंग चड्ढा या चित्रपटात ते अखेरचे दिसले होते. त्यांनी १९८९ मध्ये 'दूसरा केवल' मधून त्यांनी टीव्हीवर पदार्पण केले होते. चाणक्य, स्वाभिमान आणि कूमकूम प्यारा सा बंधन यांसारख्या अनेक टीव्ही शोमध्ये त्यांनी काम केले आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT