Latest

‘कौन बनेगा… ‘च्या सेटवर स्पर्धकांना मी टिशू देतो आता माझ्यावर वेळ…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'कौन बनेगा करोडपती १५' या गेम शोमध्ये अभिनेता आणि कार्यक्रमाचा होस्ट अमिताभ बच्चन यांच्या ११ ऑक्टोबर रोजी ८१ व्या वाढदिवस साजरा होत आहे. या खास प्रसंगाच्या निमित्ताने भागात अनेक सर्प्राइज असणार असल्यामुळे बिग बींचा वाढदिवस अविस्मरणीय ठरला आहे.

संबधित बातम्या 

सुरुवातीला सरोद वादक, पद्म विभूषण उस्ताद अमजद अली खान गाण्यांची एक मेडली सादर करून वातावरण आल्हाददायक करतील. त्यानंतर सुपरस्टार चिरंजीवी, अनुपम खेर, विद्या बालन, विकी कौशल आणि बोमन इराणीसारख्या अनेक बॉलिवूड स्टार्संनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इतकेच नाही, तर सीझन ११ ची करोडपती बबिता तावडे, सीझन १३ ची करोडपती विजेती हिमानी बुंदेला आणि सीझन १५ चा पहिला करोडपती जसकरण सिंह हे देखील या सोहळ्यात सहभागी होणार आहेत आणि त्यांच्या लाडक्या मेगास्टारला हार्दिक शुभेच्छा देणार आहेत.

कौन बनेगा करोडपती

अमिताभ बच्चन यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाले की, 'एरव्ही मी इकडे येणाऱ्या स्पर्धकांना टिशू पेपर देत असतो, पण आता माझ्यावर ती वेळ आली आहे. या मंचावर माझा जो वाढदिवस साजरा होतो, तो सगळ्यात उत्तम असतो.' चाहत्यांच्या शुभेच्छा स्विकारताना ते नतमस्तक झाले आहेत. गेल्या काही वर्षात अमिताभ बच्चन यांनी लोकांचे जे अपार प्रेम मिळवले आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT