कर्जत: तालुक्यातील चांदे व कोंभळी येथे वन विभागाच्या कामामध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी तीनही आरोपींच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने वनपरिक्षेत्र अधिकारी शंकरराव पाटील, बलभीम राजाराम गांगर्डे, शेखर रमेश पाटोळे या तिघांवर कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली होती. श्रीगोंदा येथील सत्र न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. त्याची मुदत आज संपली असता, तपास अधिकार्यांनी काल न्यायालयात पुन्हा पोलिस कोठडी वाढवून मिळण्याची मागणी केली होती. न्यायालयात युक्तिवाद करताना तपासी अधिकार्यांनी सांगितले की, पोलिस तपासात प्रगती आहे.
आणखी काही मजुरांनी प्रत्यक्ष कामावर गेले नसल्याबाबत जबाब दिले. त्यामुळे गैरव्यवहाराच्या रकमेत वाढ झाल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे आरोपींकडे आणखी सखोल तपास करण्यासाठी दोन दिवस पोलिस कोठडी वाढवून मिळावी, ही विनंती न्यायालयाने मान्य करुन दोन्ही गुन्ह्यांतील तीन आरोपींची पोलिस कोठडी दोन दिवसांनी वाढविली. गुन्ह्यांचा तपास पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर व पोलिस निरीक्षक गहिनीनाथ गमे हे करीत आहेत.
हेही वाचा: