Latest

कोल्हापूर : गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, रंकाळा टॉवर आणि पडळमध्ये छापा

backup backup

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : वैद्यकिय परवाना अथवा शैक्षणिक अर्हता नसतानाही बेकायदेशीररीत्या गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा कोल्हापूर पोलिसांनी आज (दि.०७) गुरुवारी मध्यरात्री पर्दाफाश केला. कोल्हापूर येथील हरिओमनगर अंबाई टँक रंकाळा परिसर तसेच पन्हाळा तालुक्यातील पडळ येथील रुग्णालयावर छापा टाकून दोन बोगस डॉक्टरसह तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दरम्यान त्यातील एक संशयित पसार झाला आहे. याप्रकरणी गुरुवारी पहाटे पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये बोगस डॉक्टर उमेश लक्ष्मण पोवार (वय ४६, रा. करंजफेण, ता. शाहूवाडी, सध्या राहणार हरिओमनगर अंबाई टँक रंकाळा परिसर कोल्हापूर), हर्षल रवींद्र नाईक (वय ४० रा. प्रतिराज गार्डन फुलेवाडी रिंग रोड कोल्हापूर), एजंट भरत पोवार (कोल्हापूर), दत्तात्रय महादेव शिंदे (वय ४२ रा. पडळ, ता. पन्हाळा) यांचा समावेश आहे. यापैकी उमेश पोवार, हर्षल नाईक, दत्तात्रय शिंदे यांना अटक करण्यात झाली आहे. यातील भरत पोवार पसार झाला आहे.

जिल्हाधिकारी राहुल रेखावर व पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशाने गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अटक केलेल्या दोन बोगस डॉक्टरांसह तिघांची कसून चौकशी सुरू झाली आहे.

जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करून विशेष पथकाने संशयितांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

या रॅकेटचा शहरासह जिल्ह्यात किती काळापासून हा प्रकार सुरू आहे. आजवर गर्भपाताचे किती प्रकार घडले आहेत याची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

शासकीय रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षल वेदक, पन्हाळा पंचायत समितीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल कवठेकर, डॉक्टर सुनंदा गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा आमले, महिला कॉन्स्टेबल रूपाली यादव, सामाजिक कार्यकर्त्या गीता हसुरकर यांच्या पथकाने संशयित टोळीचा भांडाफोड केला आहे.

कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांच्या सतर्कतेमुळे रॅकेटचा पर्दाफाश

जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबल रूपाली यादव यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली. रूपाली यादव बनावट ग्राहक म्हणून रिक्षातून अन्य सहकाऱ्यांसमवेत बुधवारी रात्री पडळ येथे गेल्या होत्या. बनावट डॉक्टर हर्षल नाईक याने रूपाली यादव यांच्याकडून पाच हजार रुपये घेऊन गर्भपाताच्या तीन गोळ्या आणि पूड दिली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT