पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) हैदराबादमध्ये ऑक्टोबर महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. मोहम्मद जाहिद, माज हसन फारुख आणि समीउद्दीन, अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. तिघांनाही बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (यूएपीए) अंतर्गत अटक करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मुख्य आरोपी जाहिदने लष्कर आणि आयएसआयच्या सांगण्यावरून माज हसन आणि समीउद्दीन सारख्या अनेक तरुणांची भरती केल्याचा आरोप आहे. गेल्या महिन्यात २५ जानेवारी रोजी या तीन आरोपींसह अन्य काहीजणांविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता, असे NIA च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
जाहिदने त्याच्या साथीदारांसह सामान्य लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचला होता. जाहिदने हे सर्व पाकिस्तानमधील एजंटच्या सांगण्यावरून केले. त्याला पाकिस्तानातील हँडलर्सकडून हँडग्रेनेड देखील मिळाले होते, त्यांना गर्दीच्या ठिकाणी स्फोट करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, असेही एनआयएला तपासात आढळून आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा :