पुढारी ऑनलाईन डेस्क : अलीकडच्या काळात जंगली प्राण्यांचा मानवी वस्तीतला वावर दिवसेंदिवस वाढतचं चालला आहे. विशेषतः बिबटे, वाघ यासारखे जंगली प्राणी मानवी वस्तीत फिरताना दिसले आहेत. हे प्राणी कधी पाळीव प्राण्यांवर तर कधी माणसांवर हल्ले करत असल्याच्या घटना देखील घडत आहेत. असाच एक व्हिडिओ आयएफएस अधिकारी प्रविण कस्वा यांनी ट्वीटरवर शेअर केला आहे. ज्यामध्ये एका बिबट्याने रस्त्याकडेला झोपलेल्या कुत्र्याची शिकार केली असल्याचे दिसत आहे.
हा व्हिडिओ पाहून तुमचं मन सुन्न होवू शकतं. या व्हिडीओत रात्री शिकारीच्या उद्देशाने बाहेर पडलेला बिबट्या दिसत आहे. रस्त्याकडेला एक व्यक्ती खाटेवर झोपलेला दिसत आहे. त्याच्या बाजुला कुत्रा झोपलेला आहे. बिबट्याने दबक्या पावलांनी येत थेट कुत्र्यावर झडप घातली आणि कुत्र्याची शिकार केली. कुत्र्यानेही जीव वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण, त्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. यावेळी खाटेवर झोपलेला व्यक्ती बघतच राहिला. ३५ सेकंदांच्या या व्हिडिओने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवला.
हेही वाचा ;