Latest

शिवाजी पार्कमध्ये रंगला ‘फ्रि हिट दणका’ चा सामना

अनुराधा कोरवी

मुंबई; पुढारी ऑनलाईन: खेळाडूंची धावपळ, चौकार, षटकार, अटीतटीचा सामना, कोण जिंकणार याची उत्सुकता यामुळे सर्वांनाच प्रश्न पडला असेल की, ही क्रिकेटची मॅच नक्की कुठली आहे. तर ही मॅच रंगली होती दादरच्या शिवाजी पार्कच्या मैदानात. 'फ्रि हिट दणका' ची टीम विरुद्ध मीडिया आणि शिवाजी पार्क मैदानातील खेळाडू असणार आहेत. या अटीतटीच्या सामन्यात अखेर 'फ्रि हिट दणका' ने आपला दणका दाखवलाच.

या क्रिकेटच्या सामन्यात 'फॅन्ड्री' फेम सोमनाथ अवघडे, अपूर्वा एस., 'सैराट' चित्रपटातील सुपरहिट जोडी अरबाज शेख (सल्या) आणि तानाजी गालगुंडे (लंगड्या), हरीश थोरात, सुनील मगरे यांच्यासह अनेकांनी या मॅचमध्ये सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे विजेत्यांचे कौतुक करण्यासोबत या सामन्यात सहभागी झालेल्या शिवाजी पार्कमधील क्रिकेटप्रेमींनाही यावेळी क्रिकेट किट देऊन गौरविण्यात आले.

या क्रिकेट मॅचच्या निमित्ताने सोमनाथ अवघडेने एक किस्सा शेअर केला आहे. मुळात हा चित्रपट क्रिकेटवर आधारित असल्याने क्रिकेटमधील अनेक बारकावे लक्षात घेणे खूप महत्वाचे होते. एरव्ही क्रिकेट खेळणे आणि रीतसर पद्धतीने क्रिकेट खेळणे यात खूप फरक आहे. जरीही तो अभिनय असला तरीही कुठेही तो अनैसर्गिक वाटू नये, यासाठी सोमनाथने खूप मेहनत घेतली आहे.

त्याने सतत क्रिकेटचा सराव केला. अनेक क्रिकेटचे व्हिडिओ बघितले. मिळेल त्या वेळात तो क्रिकेटचा सराव करायचा. एकदा अशीच सरावादरम्यान त्याला गंभीर दुखापतही झाली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत त्याने सराव केला आणि त्याच परिस्थितीत चित्रीकरणही पूर्ण केले. या दुखापतीचा त्याच्या चेहऱ्यावर कुठेही लवलेशही दिसला नाही. त्याची ही मेहनत चाहत्यांना 'फ्री हिट दणका' मध्ये दिसणार आहे.

एसजीएम फिल्म्स प्रस्तुत 'फ्री हिट दणका' १७ डिसेंबर २०२१ रोजी चाहत्यांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा आणि पटकथा सुनील मगरे यांची असून लेखन आणि संवाद संजय नवगीरे यांचे आहेत. आकाश अलका बापू ठोंबरे, मेघनाथ गुरुनाथ सोरखडे आणि सुनिल मगरे निर्मित या चित्रपटाचे नितीन बापू खरात, सुधाकर लोखंडे सहनिर्माता आहेत.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT