किरण नवगिरे 
Latest

कृषिकन्या किरण नवगिरे पोहोचली ‘आयपीएल’मध्ये

अमृता चौगुले

सुनील जगताप

पुणे : 'ती' ग्रामीण भागातून आलेली एक साधी सरळ अ‍ॅथलीट. घरची परिस्थिती हलाखीची… पण पुण्याच्या आझम क्रिकेट अकादमीत तिने क्रिकेटचे धडे गिरवले अन् आता तिने थेट गवसणी घातली आहे महिलांच्या 'आयपीएल'ला!

ही कामगिरी करणारी 'ती' आहे, एका शेतकर्‍याची मुलगी. किरण नवगिरे तिचं नाव. 'पुढारी'शी संवाद साधताना किरण म्हणाली, 'माझे आई-वडील शेतकरी आहेत. मला दोन भाऊ आहेत. सोलापूरमध्ये शालेय स्तरावरच अ‍ॅथलेटिक्समध्ये करिअर करीत असताना पदवीच्या शिक्षणासाठी बारामतीला यावे लागले. बारामतीत आल्यानंतरही भालाफेक, शॉटपुट आणि 100 मीटर शर्यत या प्रकारात पदके जिंकली. कालांतराने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघाचे नेतृत्वही केले आहे.'

किरणने नंतर आवडत्या क्रिकेट कडे लक्ष वळवले. आझम कॅम्पसमधील अकादमीत जॉन्टी गिलबिले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. सध्या गुलजार शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करते आहे. नागालँड संघाकडून खेळताना वरिष्ठांच्या टी-20 स्पर्धेत तिने 76 चेंडूंत 10 चौकार आणि 16 षटकारांसह नाबाद 162 धावा काढत विक्रमी कामगिरी केली आहे.

महेंद्रसिंह धोनीच आदर्श

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम. एस. धोनी हा किरणचा आदर्श आहे. धोनी ज्या पद्धतीने शांत राहतो आणि मोठे षटकार मारतो, ते मला आवडते. मी त्याच्यापासून प्रेरित आहे. जेव्हा मी खेळते, तेव्हा मी तेच करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे किरणने यावेळी सांगितले. क्रिकेटमधील कामगिरी उत्कृष्ट होत असून, आत्ताच्या 'आयपीएल'मध्ये मी माझी कामगिरी अजून उंचावणार आहे. 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताला जिंकून द्यायचे माझे ष्वप्न आहे आहे, असे किरण सांगते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT