पुणे, पुढारी वृत्तसेवा : आंतरराष्ट्रीय विमानतळावर चक्क कुत्र्यांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. एअरपोर्टच्या गेटवरच पायलटच्या मागे कुत्री लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी, म्हणून पुण्याचा नावलौकिक वाढत आहे. मात्र वाढणाऱ्या शहरांमध्ये विद्रूप स्वरूपाच्या अनेक बाबी पाहायला मिळत आहेत. पुणे विमानतळावर (Pune Airport) प्रवाशांच्यामागे आणि एअर होस्टेज, पायलटच्या मागे बेवारस कुत्री लागत असल्याने एकच विषय चर्चेचा झाला आहे.
(Pune Airport ) विमानतळ परिसरामध्ये बेवारस कुत्री नेहमी रस्त्यात ठाण मांडून बसलेली असतात. ज्येष्ठ नागरिक, मुलांना जीव मुठीत घेवून चालावे लागते. पुणे महापालिकेने रस्त्यावरील अशा कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी अनेक वेळा करण्यात आली आहे. तरीदेखील या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. विमानतळ परिसरातील नागरिक मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाटाने त्रस्त झाले आहेत. रात्रभर भुंकणे आणि दिवसा वाहनधारकांच्या मागे धावणे, पादचाऱ्यांवर गुरगुरणे हाच त्यांचा दिनक्रम असतो. महापालिकेने या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी त्रस्त नागरिक करत आहेत.
मोकाट कुत्री हा एक गंभीर प्रश्न बनला आहे. दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नागरिकांवर हल्ले करण्यापर्यंत मोकाट कुत्र्यांनी मजल गेली आहे. विमानतळावरील जाणारे रस्त्यावरून जाणारे नागरिक, दुचाकीधारक, सायकलस्वार यांना कुत्र्यांकडून लक्ष केले जाते. बऱ्याचदा घाबरून वाहनधारकांचे अपघातही होतात. विशेष म्हणजे हे सर्व कुत्रे एकत्र समूहाने राहतात. या समूहांनी स्वत:च्या हद्दी बनविलेल्या असतात. एकमेकांच्या हद्दीत आलेल्या कुत्र्यांवर हे समूहाने हल्ला सुरु करतात. रात्रभर एकमेकांवर भुंकत नागरिकांच्या झोपा उडविण्याचे काम आणि दिवसा पादचाऱ्यांना त्रस्त करतात. दिवसा चारचाकी वाहनांच्या खाली यांचा निवास असतो. वाहन, नागरिक किंवा अन्य कुत्रे दिसले, की हे अचानक हल्ला चढवितात. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
हेही वाचलंत का ?