Latest

Viral video : प्री-वेडिंग फोटोशूट, पोज देताना कपलचा तोल गेला अन् त्यानंतर जे घडलं ते पाहून…

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

सध्या लग्नाआधी प्री-वेडिंग फोटोशूटचा (pre wedding photoshoot) ट्रेंड आहे. प्री-वेडिंग फोटोशूट स्पेशल बनवण्यासाठी लोक वेगवेगळ्या भन्नाट आयडिया शोधत असतात. असाच एक प्री-वेडिंग फोटोशूटचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Viral video) होत आहे. असे फोटोशूट तुम्ही कधी पाहिले नसेल असा मजेशीर व्हिडिओ आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत चिखल दिसत आहे. हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल की इथे प्री-वेडिंग फोटोशूट सुरु आहे. यात नवरी मुलगी व्हाइट वनपीस ड्रेसमध्ये दिसत आहे. नवरा मुलग्याने कोट/ब्लेझर घातला आहे. त्यानंतर दोघांचे फोटोसेशन सुरु होते. फोटोग्राफर त्यांचे वेगवगेळ्या पोजमधील फोटो काढणे सुरु करतो. याच दरम्यान फोटोग्राफर त्यांना एक पोज देण्यास सांगतो. त्यानंतर नवरा मुलगी नवरी मुलीला उचलून घेण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचा तोल जातो आणि दोघेही चिखलात पडतात. यावेळी पांढरा शुभ्र ड्रेस घातलेल्या नवरीच्या चेहऱ्यावरील भाव पाहून तिची प्रतिक्रिया काय होती याची कल्पना येते.

हा Viral video पाहून अनेकांनी स्माइली इमोजी टाकत कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडिओला सुमारे १० हजार लाइक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT