मुंबई ; पुढारी वृत्तसेवा उद्धव ठाकरे यांची आज (रविवार) मालेगावमध्ये सभा होणार आहे. या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या सभेपूर्वीच एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना मोठा झटका दिला आहे. कारण ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये ३ माजी नगरसेवकांसह काही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. विशेषत: संजय राऊत हे नाशिकमध्येच असतानाच या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
नाशिकमधील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
नाशिकच्या मालेगावमध्ये सायंकाळी उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. नाशिकहून ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुख शशिकांत कोठुळे यांच्यासह माजी नगरसेविका श्यामला हेमंत दीक्षित, माजी नगरसेवक उत्तम दोंदे, प्रभाकर पाळदे यांच्यासह शरद देवरे, शोभा गटकाळ, मंगला भास्कर, शोभा मगर, अनिता पाटील, ज्योती देवरे, आशा पाटील, सीमा पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
हेही वाचा :