धुळे: पुढारी वृत्तसेवा: धुळे जिल्ह्यातील पळासनेर येथे मुंबई- आग्रा महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली आहे.
या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांना दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
हेही वाचा