Latest

Covid 19 | चिंता वाढली : देशात कोरोनाचे ३३६ नवीन रुग्ण आढळले

अविनाश सुतार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: देशात थंडीचे आगमन होताच कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. आज (दि.१७) भारतात 335 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यासह, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1,701 वर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकाद्वारे दिली आहे. Covid 19

आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारतात कोविड-19 चे रुग्ण 4 कोटी 50 लाख 4 हजार 816 वर पोहोचले आहेत, तर देशात 5 लाख 33 हजार 316 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Covid 19 : बरे होण्याचा दर 98.81 टक्क्यांवर पोहोचला आहे.

याशिवाय कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. देशातील 4 कोटी 44 लाख 69 हजार 799 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील बरे होण्याचा दर 98.81 टक्क्यांवर पोहोचला आहे, असे आरोग्य मंत्रालयाने पत्रकात नमूद केले आहे.

केरळमध्ये कोविड-१९चा सबव्हेरियंट आढळला

केरळमध्ये कोविड-१९चा सबव्हेरियंट आढळला आहे. JN-1 असे या सबव्हेरियंटचे नाव आहे. आरटी-पीसीआर टेस्ट केली असता ८ डिसेंबर रोजी हा रुग्ण आढळला. एका महिलेला JN-1 चे संक्रमण झाले आहे. या महिलेला इन्फ्लूएंझा सारख्या आजाराची (ILI) सौम्य लक्षणे होती. शिवाय ती कोविड-19 मधून बरी झाली आहे. (Covid subvariant)

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना INSACOG प्रमुख एनके अरोरा यांनी सांगितले की, "या प्रकाराची नोंद नोव्हेंबरमध्ये झाली होती. हे BA.2.86 चा सबवेरियंट आहे. आमच्याकडे JN.1 ची काही रुग्ण आढळली आहेत. आतापर्यंत या व्हेरियंटचा कोणताही रुग्ण गंभीर असल्याची नोंद झालेली नाही." (Covid subvariant)

सध्या देशात कोविड-19 चे 90 टक्क्यांहून अधिक प्रकरणे गंभीर नाहीत. संक्रमित लोक त्यांच्या घरात एकांतात राहत आहेत. यापूर्वी सिंगापूरमध्ये एका भारतीय प्रवाशाला JN.1 चा संसर्ग आढळून आला होता. हा माणूस मूळचा तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील रहिवासी असून 25 ऑक्टोबरला तो सिंगापूरला गेला होता.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT