सातार्‍यात 135 गणेश मंडळांनी घेतले परवाने Pudhari Photo
Ganeshotsav

सातार्‍यात 135 गणेश मंडळांनी घेतले परवाने

परवानगी घेण्याची आज अंतिम मुदत : कारवाईचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातार्‍यात गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला 135 गणेशोत्सव मंडळांनी परवानग्या घेतल्या आहेत. 7 सप्टेंबरपर्यंत परवानगी घेण्याची मुदत आहे. विनापरवाना मंडप उभारणार्‍या मंडळांवर कारवाई करण्याचा इशारा सातारा पालिकेने दिला आहे. पावसाच्या सरी झेलत अनेक गणेश मंडळांनी साऊंड व लेझर सिस्टीमच्या दणदणाटात बेधुंद होत गणेश मूर्ती आगमनाच्या मिरवणुका काढल्या. गणेशोत्सवाचा मुख्य दिवस सोडून तब्बल महिनाभर आधीपासूनच गणेश आगमनाच्या मिरवणुका काढण्याचा नवा ट्रेंड निर्माण झाला आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस अगोदर सातारा शहर व उपनगरांमध्ये गणेश मंडळांनी सायंकाळनंतर आगमन मिरवणुकांचे आयोजन केले होते. परवानगी मिळवलेल्या या मंडळांकडून गणेशोत्सवाची थाटात तयारी सुरू झाली आहे.

‘माय सातारा’ या अ‍ॅपवर ही सुविधा उपलब्ध

सातारा पालिकेकेकडून आतापर्यंत 135 गणेश मंडळांनी परवाने घेतले आहेत. उर्वरित गणेश मंडळांसाठी 7 सप्टेंबर ही परवाने घेण्याची अंतिम मुदत आहे. परवाने घेण्यासाठी गणेश मंडळांची नगरपालिकेत लगबग सुरू आहे. परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तात्काळ परवाने दिले जात आहेत. गणेश मंडळांना परवान्यासाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी नगरपालिकेने ‘माय सातारा’ या अ‍ॅपवर ही सुविधा उपलब्ध केली आहे. तसेच नोंदणीसाठी वेबसाईटचाही वापर मंडळांना करता येणार आहे.

परवागनीपेक्षा मंडळांनी टाकले मोठे मंडप

गणेश मंडळांना अटी शर्तीवर परवानगी देण्यात आली आहे. काही मंडळांनी अवाढव्य मंडप घातले असून निम्मा रस्ता व्यापला आहे. अशा रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे. परवानगीत नमूद केलेल्या जागेपेक्षाही मोठे मंडप उभारण्यात आले आहेत. देखावे बसवणार्‍या मंडळांचे मंडप आता रस्त्यात आले आहेत. अशा मंडळांनी देखावे बसवले तर नागरिकांना भर रस्त्यात उभे राहून जीव मुठीत घेऊन देखावे पहावे लागणार आहेत. अशावेळी दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. शहरात बर्‍याच ठिकाणी अरूंद रस्ते असून वाहतूकही वाढली आहे. प्रचंड वर्दळ असणार्‍या रस्त्यांचा सर्वे करून त्या ठिकाणी परवानगी देण्याबाबत विचार व्हायला हवा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT