

पुढारी ऑनलाईन डेस्क : "गणपत्ती बाप्पा मोरया…", या जयघोषात लहानापासून ते मोठ्यापर्यत सर्वाची आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली आहे. सध्या गणपतीच्या आरासासोबत अनेक रंगीबेरंगी विविध प्रकारच्या फुलांनी बाजारात पेठ सजली आहे. काही- काही ठिकाणी गणपतीच्या सजावटीची तयारी सुरू झालीय. आपला लाडका गणपती बाप्पा शनिवारी ७ सप्टेंबर रोजी येत आहे. यासाठी आतापासूनच त्याच्या दुर्वापासून ते नैवेद्यापर्यत महिला वर्गाची कस लागली आहे. तर काही ठिकाणी गौरी आणि शंकराच्या सजावटीचेही साहित्य घेण्याची लगबग वाढली आहे. गणपती आल्यानंतर पहिल्यांदा त्याला त्याचे आवडीचे उकडीच्या मोदक बनवावे लागतात. त्यामुळे जाणून घेवूयात घरच्याघरी उकडीच्या मोदक कसे बनवायचे.
१ मोठा नारळ किसलेला
गूळ
२ कप तांदूळाचे पिठ
वेलचीपूड
मिठ
तांदूळाच्या उकडीत घालण्यासाठी तेल, तूप
प्रमाणानुसार पाणी
चवीनुसार मीठ
नारळाचे तुकडे पडणार नाही, याची दक्षता घेऊन नारळ सोलून घ्या. त्यानंतर गूळदेखील बारीक चिरून घ्या.
चिरलेला खूळ आणि खिसलेला नारळ हे दोन्हीदी मंद गॅसवर भाजून घ्या. त्यानंतर त्याचं सारण तयार करून घ्या. हे करत असताना त्यामध्ये वेलची पावडर घाला.
जर तुम्हाला खवा, काजू, बदाम आणि बेदाणे आवडत असतील तर, सारण तयार करताना तेही घालू शकता.
२ कप तांदूळाचे पिठ घेवून त्यात गरम पाणी घालून ते मळून घ्यावे.
पीठ मळून झाल्यानंतर हाताला तेल लावून मोदकाची पारी तयार करावी.
पारी तयार करून झाली तर त्यामध्ये सारण भरून घ्या.
त्यानंतर मोदकाच्या व्यवस्थित पाळ्या तयार करून घ्या.
गॅसवर पाणी उकळत ठेवा. त्यानंतर मोदकपात्रात हे मोदक ठेवून २० मिनिटं वाफलून घ्या.
वाफललेले मोदक एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि नैवेद्य म्हणून गणपती बाप्पाला दाखवा.
शेवटी तुम्हीही उकडीच्या मोदकाचा आस्वाद घ्या.
अशाप्रकारे आपल्या लाडक्या बाप्पासाठी घरी बनवा उकडीचे मोदक