पणजी : गणेश चतुर्थीनिमित्त कोकण रेल्वे प्रशासनाने गणपती स्पेशल रेल्वे गाड्या सोडल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक मंद गतीने सुरू आहे. कोकण रेल्वे (Kokan Railway) प्रशासनाने गणपती सणासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडल्या आहेत. त्याचा परिणाम नियमित रेल्वे गाड्यांवर होत असून या गाड्या दीड ते पावणेदोन तास विलंबाने धावत आहेत. त्यासोबतच गणपती स्पेशल रेल्वे गाड्या या चार तास विलंबाने धावत आहेत. याचा फटका प्रवाशांना बसत असून कोकण रेल्वे प्रशासनाने योग्य नियोजन करून रेल्वे गाड्या सोडाव्यात अशी मागणी होत आहे.