Latest

राजधानीत ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांचे जाळे; जगभरातील बड्या शहरांच्या क्रमवारीत दिल्‍ली अव्वल

निलेश पोतदार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा  राजधानी दिल्लीला सुरक्षित बनवण्यासाठी आम आदमी पक्षाच्या सरकारने गेल्या दोन वर्षांमध्ये ५८ हजारांहून अधिक ठिकाणांवर जवळपास १ लाख ३२ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विशेष म्हणजे सरकारने सर्व ७० विधानसभा मतदार संघात १ लाख ४० हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला होता. सरकारने ठरवलेले लक्ष जवळपास पूर्ण होण्याच्या टप्प्यावर असल्याचे आकडेवारीवरून त्यामुळे दिसून आले आहे.

२०२०-२१ तसेच २०२१-२२ मध्ये ५८ हजार ६०९ ठिकाणांवर १ लाख ३१ हजार ७९२ सीसीटीव्ही लावण्यात आले. यासाठी ३०६ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. १० विधानसभा क्षेत्रात हजारांहून अधिक ठिकाणांवर सीसीटीव्ही लावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या कार्यान्वयासंबंधी दिल्ली जगातील इतर शहरांच्या तुलनेत पहिल्या स्थानावर पोहचले आहे. दिल्लीत लंडनहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

राज्यात एक मैल अंतरामागे १ हजार ८२६ कॅमेरे लावण्यात आले आहेत. तर, लंडनमध्ये हे प्रमाण १ हजार १३८ एवढे आहे. देशात सीसीटीव्ही लावण्याच्या यादीत चेन्नई दुसऱ्या तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीत चेन्नई पेक्षा तीन पटीने तसेच मुंबईहून ११ पटीने अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. महिला सुरक्षेच्या अनुषंगाने तसेच गुन्हे रोखण्यात पोलिसांना मदत करण्यात या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची बरीच मदत होत आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात १ हजार ६० ठिकाणांवर २ हजार ५५२ सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत, हे विशेष.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT