

पुढारी ऑनलाईन डेस्क : महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी त्यांची मुलगी श्वेता नंदा (Shweta Nanda) हिला त्यांचा जुहूतील प्रसिद्ध बंगला 'प्रतीक्षा' (Prateeksha bungalow ) भेट दिला आहे. एका रिपोर्टनुसार, या बंगल्याच बाजार मूल्य ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. या बंगलाच्या मालकीचे हस्तांतरण दोन वेगळ्या भेटवस्तूंद्वारे औपचारिक केले गेले आहे. दरम्यान, याबाबत औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही. ( Amitabh Bachchan gifts Prateeksha )
एका रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांनी आपली मुलगी श्वेता नंदा हिला प्रतीक्षा बंगला 8 नोव्हेंबर रोजी गिफ्ट डीड केला. या हस्तातंरासाठी त्यांनी ५०.६५ लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहेत. अतिमाभ बच्चन यांचा प्रतीक्षा बंगला हा मुंबईतील सर्वात उच्चभ्रू परिसरत जुहूमधील बंगला विठ्ठलनगर को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटमध्ये प्लॉट क्रमांक १५ मध्ये आहे. या बंगल्याचे एकूण क्षेत्रफळ 1564 चौरस मीटर आहे. बंगल्याची बाजारातील किंमत ५०.६३ कोटी रुपये आहे. मात्र बच्चन कुटुंबीयांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेले नाही. ( Amitabh Bachchan gifts Prateeksha )
अमिताभ यांनी प्रतीक्षा बंगल्यात आल्या कारकीर्दीची सुरुवात केली. येथे ते आपले आई-वडील तेजी बच्चन- हरिवंशराय बच्चन यांच्यासह राहत होते. अतिमाभ बॉलीवूड सुपरस्टार झाले तेव्हाच्या अनेक आठवणींचा साक्षीदार म्हणूनही या बंगल्याची ओळख आहे.
अमिताभ बच्चन यांचे तीन बंगले आहेत. 'प्रतिक्षा', 'जलसा' आणि 'जनक'. यापैकी अमिताभ स्वतः 'जलसा'मध्ये राहतात. रविवारी अमिताभ बच्चन त्यांच्या चाहत्यांना भेटतात तेव्हा ते त्यांना 'जलसा'च्या बाहेरच भेटतात. अमिताभ बच्चन आगामी काळात 'कल्की 2898 एडी' आणि 'थलाईवर 170' या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. नाग अश्विनच्या 'कल्की 2898 एडी'मध्ये कमल हासन तर 'थलैवर 170'मध्ये रजनीकांत मुख्य भूमिकेत आहेत.
हेही वाचा :