

नवी दिल्ली, १ जुलै, पुढारी वृत्तसेवा, Amit Shaha : केंद्र सरकारने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) अंतर्गत १९ राज्य सरकारांना ६ हजार १९४ कोटींचा निधी देण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी यासंबंधी निर्णय घेतला आहे.
या निधीत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमध्ये केंद्रीय वाटा म्हणून २०२२-२३ या वर्षासाठी छत्तीसगड, तेलंगणा, मेघालय तसेच उत्तर प्रदेश या चार राज्यांसाठी १,२०९.६० कोटी रुपये आणि २०२३-२४ साठी महाराष्ट्र, आंधप्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, गोवा, हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, मणिपूर, मेघालय, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू, त्रिपुरा या १५ राज्यांसाठी ४,९८४.८० कोटी रुपयांचा निधी समाविष्ठ आहे. हा निधी वितरित केल्यामुळे राज्यांना चालू पावसाळी हंगामात उपाययोजना करण्यास मदत होईल, असा विश्वास गृहमंत्रालयाने व्यक्त केला आहे.
केंद्राने २०२३-२४ या वर्षात ९ राज्यांना एसडीआरएफमध्ये केंद्रीय वाटा म्हणून ३६४९.४० कोटी रुपये देण्यास यापूर्वीच मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींच्या आधारे वर्ष २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीसाठी एसडीआरएफकरिता १ लाख २८ हजार १२२ कोटींहून अधिक रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे.
हे ही वाचा :