Amit Shah : मोदींनी देशाला धोरण लकव्यातून बाहेर काढले : अमित शाह

Amit Shah : मोदींनी देशाला धोरण लकव्यातून बाहेर काढले : अमित शाह
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशात २००४ ते २०१४ या कालावधीत धोरण लकवा होतापंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला यातून बाहेर काढलेभारताने उत्पादन क्षेत्रात भरारी घेतली आहेजी२०चांद्रयान– ३ मोहिमेचे यशमिशन आदित्य एल१ मोहीम आणि महिला आरक्षण विधेयकाला मिळालेली मंजुरी या घटनांनी देशात उत्साह संचारला आहेअसा दावा गृहमंत्री अमित शाह यांनी आज केला.

दिल्लीतउद्योजकांची संघटना पीएचडी चेंबरच्या ११८ व्या वार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी गृहमंत्री शाह यांनी आपले मत व्यक्त केलेआगामी २५ वर्षांचा काळ संकल्पपूर्तीचा आहेअसे सांगताना गृहमंत्री अमित शाह म्हणालेकी ही २५ वर्षे संकल्प घेण्याची आणि संकल्पांना सिद्धीमध्ये रूपांतरित करण्याची वेळ आहेआपल्याला असा देश हवा आहेज्याचे स्वप्न मोदींनी दाखविले आहेस्वातंत्र्याची शतकपूर्ती करताना भारत जगातील सर्व क्षेत्रांमध्ये प्रथम क्रमांकावर असावारायझिंग इंडिया संकल्पना निवडल्याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनी पीएचडी चेंबर्सचे अभिनंदनही केले.

गेल्या ७५ वर्षातील आमची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे लोकशाहीची मुळे मजबूत करण्यात देशाला यश आले आहेअसे सांगताना गृहमंत्री अमित शाह यांनी धोरणांच्या अभावाचा उल्लेख करून आधीच्या युपीए सरकारला चिमटा काढलाते म्हणाले की आपण गुजरातमध्ये मंत्री असताना भारत सरकारच्या २००४ ते २०१४ पर्यंतच्या सर्व धोरणांचा अभ्यास केलादेशात धोरण लकवा असल्याची स्थिती होतीपरंतुपंतप्रधान मोदींनी अनेक धोरणे बनवलीइलेक्ट्रॉनिक्ससाठीचे राष्ट्रीय धोरण आणलेमेक इन इंडियाची खिल्ली उडवली जायची पण आज जगभरात उत्पादन क्षेत्रात आपण जगभरासाठी ड्रिम डेस्टिनेशन बनलो आहोतस्टार्टअप इंडियाडिजिटल इंडियास्किल इंडियाजीएसटीउडान योजनाराष्ट्रीय क्वान्टम मिशनराष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणलेया धोरणांची उदाहरणे देताना गृहमंत्री अमित शाह यांनी या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करण्यासाठी पीएचडी चेंबरने समिती तयार करावीअशी सूचना केली.

जी२०चांद्रयान चे यशमिशन आदित्य एलवन त्याचप्रमाणे महिला आरक्षण विधेयक मंजूर होणेया सर्व घटनांनी देशात नवीन उत्साह संचारला आहे. देशाने ७५ वर्षांचा आणि भूतकाळाचा प्रवास पूर्ण केला असून अनेक क्षेत्रात यश मिळविले आहेतसेच आंतरराष्ट्रीय मंचावर स्वतःला सिद्ध देखील केले आहेअसेही गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news