

पुढारी ऑनलाइन डेस्क : Alien Attack in Peru : पेरूतील एका गावात एलियनने हल्ला केला असून या हल्ल्यामुळे तेथील लोक खूपच भयभीत आहेत. या हल्ल्यात एक मुलगी जखमी असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. तेथील सुरक्षा दल अधिकारी लोकांच्या संरक्षणासाठी रोज गस्त घालत आहेत. ज्या जमातीच्या लोकांनी एलियनला पाहिले आहे आणि ज्यांच्यावर हल्ला झाला आहे त्या समुदायातील लोक खूपच घाबरलेले आहे. जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण…खरंच एलियनचाच हल्ला आहे का?
दुसऱ्या ग्रहावरून आलेल्या लोकांना एलियन असे म्हटले जाते. अमेरिका खंडात विशेष करून उडत्या तबकड्या आणि UFO बद्दल अनेक कल्पना आहेत. तसेच हॉलिवूडमध्ये अशा प्रकारचे अनेक चित्रपट निघाले आहेत. ज्यामध्ये एलियन्सने अचानक पृथ्वीवरील लोकांवर हल्ले केले आहेत. अमेरिकेत अनेकांनी आपण एलियन्सला पाहिल्याचे दावे केले आहेत. मात्र, आजपर्यंत कोठेही एलियन्सच्या अस्तित्वाचे प्रत्यक्ष प्रमाण सापडलेले नाही. तसेच कोठेही प्रत्यक्ष हल्ला झाल्याची माहिती नाही. मात्र, पेरूमध्ये एका जमातीच्या लोकांनी एलियन्सने त्यांच्यावर हल्ला केल्याचा दावा केला आहे. परिणामी ते खूप घाबरलेले आहेत. Alien Attack in Peru
डेली स्टार रिपोर्टच्या हवाल्याने आज तकने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, ज्या समुदायाच्या लोकांनी एलियनला पाहिले आहे त्यांनी त्यांचे वर्णन दिले आहे. त्यांच्या माहितीनुसार या एलियनचा रंग पिवळा आहे 7 फूट उंची आहे. कातडी इतकी जाड आहे की बंदुकीच्या गोळ्यांचा काहीही परिणाम त्यांच्यावर होत नाही. त्यांनी या एलियन्सला LOS Pelacaras (Face Peelers) असे नाव दिले आहे. पेरूच्या उत्तरपूर्व भागात स्थित आल्टो नाने जिल्ह्यात इकितू नावाच्या जमातीच्या लोकांनी ही माहिती दिली आहे. त्यांचे म्हणणे आहे की गडद रंगाची हुडी घातलेले एलियन्स त्यांच्यावर हल्ला करत आहेत. एलियन्स त्यांना म्हणतात की ते त्यांचे चेहरे खाऊन टाकतील.
सुमारे एक महिन्यापूर्वी, 11 जुलै रोजी, ती विचित्र प्रजाती प्रथमच दिसली. तेव्हापासून 15 वर्षांची मुलगी रुग्णालयात दाखल आहे. तिने एलियन्स पाहिले होते. मात्र, हे प्राणी दुसऱ्या ग्रहावरून आले आहेत, म्हणजेच ते एलियन आहेत, याची पुष्टी अद्याप झालेली नाही. त्याचवेळी या समाजाचे नेते जाइरो रेतेगुई दाविला यांनी दावा केला की, 'संघर्षादरम्यान त्यांनी त्या मुलीच्या मानेचा काही भाग कापला होता.'
आता लोकांना कथित एलियनपासून वाचवण्यासाठी रात्रीची गस्त केली जाते. महिला, लहान मुले आणि वृद्ध यांच्याबाबत अधिक कठोरता पाळली जात आहे. भीतीमुळे गावकऱ्यांना रात्री झोपायला त्रास होत असल्याचं स्थानिक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. कम्युनिटी लीडर डेव्हिला यांनी सांगितले की ते 'फेस पीलर्स' समोर आले होते. त्यांनी सांगितले की त्यांचे शूज गोलाकार आहेत, जे ते हवेत तरंगण्यासाठी वापरतात, त्यांचे डोके मोठे आहे, ते मास्क घालतात, त्यांचे डोळे पिवळे आहेत. पळून जाण्याची कला त्यांनी आत्मसात केली आहे.
ते म्हणाले, 'आम्ही जवळपास समोरासमोर भेटलो आहोत. त्याचा चेहरा क्वचितच दिसत होता. मी त्याचे संपूर्ण शरीर एक मीटर उंचीवर तरंगताना पाहिले आहे. त्याने या प्राण्यांना गोळ्या घालण्याची धमकी दिली होती, असे त्याचे म्हणणे आहे. पण गोळी लागल्यावर उठून गायब होण्यासही ते सक्षम आहेत, असेही डेव्हिल यांनी सांगितले.
हे ही वाचा :