Alia-Ranbir wedding Album : रणबीरनं आलियाला उचलून घेतलं (Video)

ranbir kapoor-alia bhatt
ranbir kapoor-alia bhatt
Published on
Updated on

video पुढारी ऑनलाईन डेस्क

रणबीर-अलियाच्या (Alia-Ranbir wedding Album) लग्नसोहळ्याला अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये अंबानी कुटुंबीय, सचिन तेंडुलकर, करीना कपूर खान, सैफ अली खान, चित्रपट निर्माते अयान मुखर्जी, लव रंजन आणि करण जोहर यांसारखे बी-टाउन सेलेब्स उपस्थित होते. वास्तू बंगल्यावर या जोडप्याने सात फेरे घेत नव्या प्रवासाची सुरुवात केली. दरम्यान, हा लग्नसोहळा खासगी स्वरुपात पार पडल्याने लग्नाला केवळ जवळचे नातेवाईक आणि खास निमंत्रित मित्रमंडळी उपस्थित होती. बाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी होती. आता रणबीर-आलियाच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Alia-Ranbir wedding Album)

४ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी मित्रपरिवाराच्या उपस्थितीत लग्न केले. यावेळी दोघेही मॅचिंग आउटफिट्समध्ये दिसले. मीडियासोबत फोटोसाठी पोज देताना दोघेही हसताना दिसले. पोज देताना रणबीरने आलियाचा हात पकडला होता.

रणबीर आणि आलियाचा मीडियासाठी पोज देतानाचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रणवीर आलियाला आपल्या मांडीवर घेऊन जाताना दिसत आहे. आलिया रणबीरच्या मांडीवर बसून हसत असून चाहत्यांना हस्तांदोलन करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

तर आणखी एका व्हिडिओमध्ये रणबीरने आलियाला उचलून घेतले आहे. आलिया भट्टनेही तिच्या इन्स्टा अकाऊंटवर लग्नाचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना आलियाने कॅप्शनमध्ये लिहिले की, आज, आमचे कुटुंब आणि मित्रमंडळींनी वेढलेल्या, घरी… आमच्या आवडत्या ठिकाणी – बाल्कनीमध्ये आम्ही आमच्या नात्याची ५ वर्षे घालवली – तिथे आम्ही लग्न केले. आमच्या मागे बरेच काही असताना, आम्ही एकत्र आणखी आठवणी तयार करण्यासाठी थांबू शकत नाही … ज्या आठवणी प्रेम, हशा, आरामदायी शांतता, चित्रपट रात्री, मूर्खासारखी मारामारी, वाईन डिलाइट्स आणि चायनीजने परिपूर्ण आहे.

आमच्या आयुष्यातील या अत्यंत महत्वाच्या काळात सर्व प्रेम आणि स्मरणीय आठवणींबद्दल धन्यवाद. यामुळे हा क्षण अधिक खास झाला आहे.
प्रेम, रणबीर आणि आलिया ✨♥️♾

पाहा रणबीर-आलियाचा फोटो अल्बम –

(photo : __ranbir_kapoor_official__insta वरून साभार)

ranbir kapoor-alia bhatt
ranbir kapoor-alia bhatt

video- aliabhatt.news insta

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news