चर्चा रणबीरच्या लग्नाची, पत्रिका व्हायरल ऋषी-नीतूच्या लग्नाची!

चर्चा रणबीरच्या लग्नाची, पत्रिका व्हायरल ऋषी-नीतूच्या लग्नाची!
Published on
Updated on

नवी दिल्‍ली ; पुढारी ऑनलाईन  अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Ranbir-Alia) यांच्या लग्‍नाची सर्वत्र चर्चा आहे. या बहुचर्चीत लग्‍नाच्या रोज नवनव्या तारखा समोर येत आहेत. हे नक्‍की आहे की, आलिया आणि रणबीर हे लग्‍नाच्या बेडीत अडकणार आहेत. या दरम्‍यान एक पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही पत्रिका खूप जुनी आहे. विशेष म्‍हणजे ती ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या लग्‍नाची आहे. मुलाच्या लग्‍नाची पत्रिका अजुनही समोर आलेली नाही, मात्र रणबीर कपूरची आई आणि वडिलांच्या लग्‍नाची पत्रिका मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्‍यांकडून यावर प्रतिक्रिया येत आहेत.

ऋषी-नीतूच्या लग्‍नपत्रिका… 

गेल्‍या काही दिवसांपासून ही पत्रिका व्हायरल होत आहे. ही पत्रिका पांढऱ्या रंगाची असून, साधी आहे. ही पत्रिका जुनी झाल्‍यानं थोडी मळलेली दिसून येत आहे. पत्रिकेवर मोठ्या अक्षरात राज कपूर यांचं नाव लिहिलं आहे. ही लग्‍नपत्रिका ऋषी आणि नीतू यांच्या लग्‍नाची आहे. ही पत्रिका इंग्‍लिशमध्ये छापण्यात आली हाेती. यात ऋषी कपूर यांचे मोठे बंधू रणधीर कपूर यांच्यासह ऋषी कपूर यांचे दोन्ही काका शम्मी कपूर आणि शशी कपूर यांच्याही नावाचाही उल्लेख आहे.

ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचे 23 जानेवारी 1980 रोजी लग्न झाले होते. आरके स्टुडिओमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. या लग्नाला चित्रपटसृष्टीतील अनेक पाहुणे उपस्थित होते. लग्नानंतर नीतू कपूरने चित्रपट क्षेत्रातून ब्रेक घेतला. त्यानंतर तब्बल १५ वर्षांनी लव्ह आज कल या चित्रपटातून त्याने पुनरागमन केले. आता ती जुग जुग जियो या चित्रपटात दिसणार आहे. दुसरीकडे, ऋषी कपूरबद्दल बोलायचे तर, त्‍यांचे 2020 मध्ये निधन झाले. त्यांच्यावर कॅन्सरवर उपचार सुरू होते. नुकताच त्यांचा शर्माजी नमकीन हा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

आलिया आणि रणबीरच्या (Ranbir-Alia) लग्नाबद्दल बोलायचे झाले तर असे मानले जात आहे की, १४ एप्रिलला हे दोघे लग्न करणार आहेत. लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. यानंतर १७ एप्रिलला हे जोडपे ताज पॅलेसमध्ये रिसेप्शनही देणार असल्याच्या बातम्या येत आहेत; परंतु हे जोडपे त्यांच्या कामाच्या वचनबद्धतेमुळे त्यांचे हनिमून प्लॅन पुढे सरकवत आहेत. आलिया तिच्या हॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज असतानाच रणबीर कपूर शमशेरा या चित्रपटात दिसणार आहे. ते दोघेही ब्रह्मास्त्र चित्रपटामध्येही दिसणार आहेत.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news