

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रकूल स्पर्धेत तिहेरी उडी स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज इतिहास रचला. एल्डहाेसे पाॅल याने सुवर्ण पदकावर माेहर उमटवली. त्याची ही आजवरची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. तसेच अशी कामगिरी करणारा ताे भारताचा पहिला ॲथलिट ठरला आहे. पाॅलसोबत भारताच्या अब्दुल्ला अबुबकरने १७.०२ मीटर लांब उडी मारून रौप्यपदक आपल्या नावावर केले.
पाॅलने १७.०३ मीटर अंतराची तिहेरी उडी मारून सुवर्णपदक जिंकले. या कामगिरीमुळे भारताच्या खात्यावर १६ वे सुवर्ण पदक नाेंदले गेले. पाॅल हा तिहेरी उडीमध्ये १७ मीटर अंतर कापणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. पाॅलसोबत भारताच्या अब्दुल्ला अबुबकरने १७.०२ मीटर तिहेरी उडी मारून रौप्यपदकाची कमाई केली. प्रवीण चित्राळे चौथ्या स्थानावर राहिला. त्याचे कांस्यपदक केवळ 0.03 मीटर अंतराने हुकले. त्याने 16.89 मीटर अंतराची लांब उडी मारली.
हे वाचल का?