Akshay Kumar : अक्षय कुमार केदारनाथच्या चरणी, भक्तीत तल्लीन अभिनेता (Video)
पुढारी ऑनलाईन डेस्क : अक्षय कुमार (Akshay Kumar ) सध्या उत्तराखंडच्या दौऱ्यावर असून तो बाबा केदारनाथच्या दर्शनासाठी गेला आहे. अक्षय कुमारने आजूबाजूला उंच डोंगरांमध्ये केदारनाथ मंदिराचे व्हिडिओ शेअर केले आहे आणि लिहिले आहे, 'जय बाबा भोलेनाथ.' या व्हिडिओंध्ये पार्श्वभूमीत 'हर हर शंभू' हे गाणे वाजत आहे. (Akshay Kumar)
केदारनाथ मंदिराच्या आतून अक्षयचा व्हिडिओही समोर आला आहे. केदारनाथांचे दर्शन घेतल्यानंतर अक्षय हात जोडून 'जय भोलेनाथ'चा जयघोष करताना दिसतो. मंदिरात अक्षयच्या आजूबाजूला मोठी गर्दी दिसत आहे. अक्षय त्यांच्यासोबत उभा असल्याचे दिसत आहे. यावेळी सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आल्याचे दसते. मंदिरात तो भाविकांसह भक्तीत तल्लीन झालेला दिसतो.
video – M A S A L U twitter
आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी डेहराडूनला
अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी डेहराडूनला पोहोचला होता आणि मंगळवारी हेलिपॅडवरून केदारनाथला पोहोचला. आता त्याला रुरकीमध्ये शूटिंग करायचे आहे.
video- axay patel twitter
अक्षय कुमारचे 'क्या लोगे तुम' गाणे
नुकतेच अक्षय कुमारचे 'क्या लोगे तुम' हे गाणे रिलीज झाले आहे, जे बी. प्राकने गायले आहे. हे गाणे अक्षय आणि अमायरा दस्तूर यांच्यात चित्रित करण्यात आले आहे. यापूर्वी बी प्राक आणि अक्षयने 'फिलहाल' आणि 'फिलहाल २' मध्ये एकत्र काम केले आहे.

