

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेटपटू अक्षर पटेलने गुरुवारी (दि.२६) वडोदरा येथे मेहा पटेलसोबत लग्नगाठ बांधली. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू त्याच्या लग्नामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत सहभागी झाला नव्हता. अक्षरने त्याच्या लग्नाचे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ शेअर केले नसले तरी ट्विटरवरील अनेक चाहत्यांनी काही छायाचित्रे शेअर केली आहेत. (Akshar Patel)
मेहा आणि अक्षर बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. मेहा पटेल ही व्यवसायाने डायटिशियन आहे. रवींद्र जडेजाच्या दुखापतीमुळे अक्षर पटेलला भारतीय संघात स्थान देण्यात आले. त्याने आपल्या गोलंदाजीमुळे व फलंदाजीने छाप पाडली. लग्नानंतर अक्षर पटेल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून टीम इंडियात परतणार आहे. (Akshar Patel)
हेही वाचा;