Ajit Agarkar : अखेर ठरलं; अजित आगरकरांची भारतीय क्रिकेट निवड समितीच्या चेअरमनपदी नियुक्ती
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेटच्या वरिष्ठ खेळाडूंच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून समितीच्या चेअरमनपदी आगरकरांच्या नावाची जोरदार चर्चा होती. (Ajit Agarkar)
यापूर्वीचे निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशन प्रकरणानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळं १७ फेब्रुवारीपसून हे पद रिक्त होतं. गेल्या दोन दिवसांपासून अजित आगरकर हे भारतीय वरिष्ठ पुरूष संघाच्या निवडसमिती अध्यक्षदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा होती. (Ajit Agarkar)
सध्या निवडसमिती अध्यक्षाला वर्षाला १ कोटी रूपये मानधन मिळते. तर, सदस्यांना ९० लाख रूपये मिळतात. अजित आगरकरांनी निवड समिती अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला. अर्ज करणाऱ्यांच्या यादीत आगरकर हे एकमेव मोठं नाव आहे. आगरकर यांनी गुरूवारी दिल्ली कॅपिटल्सच्या सहाय्यक प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी यापूर्वी २०२० मध्ये देखील निवडसमिती सदस्यासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यावेळी बीसीसीआयने त्यांची निवड केली नव्हती.
हेही वाचा;
- SAFF Championship : 'भारतच बादशाह!'; कुवेतला नमवत सॅफ चॅम्पियनशिपचे नवव्यांदा विजेतेपद पटकावले
- महागावच्या सचिनची पी.एस.आय पदी निवड | MPSC Success : PSI Result
- पीएसआय परिक्षेचा रखडलेला निकाल जाहीर; संभाजीनगरमधील सुनील महाराष्ट्रातून पहिला | MPSC PSI Result
- NIA Charge sheet : कोलकाता मध्ये दोन दहशतवाद्यांविरोधात आरोपपत्र दाखल; एनआयएची कारवाई
- Hyderabad Car Accident : मॉर्निंग वॉकला निघालेल्या दोन महिलांसह एका मुलाला भरधाव कारने चिरडले; पाहा व्हिडिओ

