

रविवार दिनांक 22 मे रोजी झालेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेमध्ये मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी असा दावा केला की पुण्यातील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरांच्या जागेमध्ये दर्गे उभारण्यात आले आहेत. अजय शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे पुणे शहर आणि नारायणेश्वर या मंदिराच्या इतिहासाबद्दल अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.
मुघल आक्रमकांनी पुण्यातील पुण्यश्वर आणि नारायणेश्वर ही दोन मंदिरे पाडून तिथे दर्गा उभा केला. यातील एक मंदिर शनिवारवाड्याच्या समोर आहे, तर दुसरं मंदिर लाल किल्ल्याजवळ आहे,असं वक्तव्य अजय शिंदे यांनी केलं. याबाबत त्यांनी पुरातत्व विभाग आणि राज्य सरकारला पत्रही लिहिलं आहे.
त्याच प्रमाणे याठिकाणी त्या मंदिराचे अवशेष देखील सापडल्याचे सांगितले.तसंच या मंदिरांसाठी मनसे आगामी काळात लढा उभारणार असल्याची घोषणा अजय शिंदे यांनी केली आहे. तसेच पुण्येश्वर आणि नारायणेश्वर या मंदिराच्या मुक्ततेसाठी सर्व पुणेकरांना एकत्र येण्याचे आवाहन देखील अजय शिंदे यांनी केला आहे.
हे ही वाचा: