कन्नड स्टार सुदीप हिंदी भाषेवर बोलताच बॉलिवूड ‘सिंघम’ची सटकली ! दोघांमध्ये रंगले ‘ट्विट वॉर’

कन्नड स्टार सुदीप हिंदी भाषेवर बोलताच बॉलिवूड ‘सिंघम’ची सटकली ! दोघांमध्ये रंगले ‘ट्विट वॉर’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ajay Devgn vs Sudeep : एकीकडे देशभरात साऊथच्या चित्रपटांचा दबदबा वाढत आहे. तर, दुसरीकडे हिंदी ही राष्ट्रभाषा आहे की नाही यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या वादाची ठिणगी आता चित्रपट उद्योगामध्येही पडली आहे. याला कारणीभूत ठरली आहे ती साऊथ चित्रपट उद्योगातील हिट खलनायक किच्चा सुदीपच्या व्हिडिओ मुलाखतीनंतर. या व्हिडिओमध्ये सुदीप यांनी हिंदी भाषा ही आपली राष्ट्रभाषा नसल्याचे म्हटले आहे. आता किचा सुदीपच्या या वादग्रस्त विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावर अजय देवगणने दाक्षिनात्य अभिनेत्याला चोख प्रत्युत्तर देत प्रतिक्रिया दिली आहे.

अजयची देवगणची प्रतिक्रिया…

अजय देवगणने ट्विट करून कन्नड अभिनेता सुदीपला खडेबोल सुनावले आहेत. अजय म्हणतो, 'किच्चा सुदीप, माझ्या भावा, जर तुमच्या मते हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही तर तुम्ही तुमच्या मातृभाषेतील चित्रपट हिंदीत डब करून का प्रदर्शित करता? हिंदी आमची मातृभाषा आणि राष्ट्रभाषा होती, आहे आणि नेहमीच राहिल. जन गण मन.' (Ajay Devgn vs Sudeep)

सुदीपचे मोठे वक्तव्य…

'KGF 2' आणि 'RRR' सारखे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर साऊथ आणि बॉलीवूडमधील मनोरंजन उद्योगात एक वेगळीच चर्चा सुरू झाली. बॉलीवूडचे चित्रपट आणि साऊथचे चित्रपट यांची तुलना होत असतानाच भाषेवरही प्रश्न उपस्थित झाले. पॅन इंडिया स्तरावर वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होत असताना. अलीकडेच साऊथ स्टार किचा सुदीपने एका कार्यक्रमात, हिंदी आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही आणि बॉलीवूड तामिळ आणि तेलगूमध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपडत आहे, असे मोठे वक्तव्य केले होते. (Ajay Devgn vs Sudeep)

सुदीप म्हणाला होता की, पॅन इंडिया चित्रपट कन्नडमध्ये बनत आहेत, मला त्यावर एक छोटीशी दुरुस्ती करायची आहे. हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही. बॉलिवूडमध्ये आज पॅन इंडिया चित्रपट बनत आहेत. ते तेलुगू आणि तमिळ चित्रपटांचे रिमेक बनवत आहे, पण असे असूनही त्यांना संघर्ष करावा लागत आहे. आज आम्ही ते चित्रपट बनवत आहोत जे जगभरात पाहिले जात आहेत, असे विधान त्याने केले होते. यानंतर चांगलाच गदारोळ माजला. (Ajay Devgn vs Sudeep)

साऊथ सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर आज ही इंडस्ट्री खूप वेगाने प्रगती करत आहे. दाक्षिणात्य चित्रपट कमाईच्या बाबतीत विक्रम करत आहेत. 'बाहुबली', 'पुष्पा', 'RRR' आणि 'KGF' सारख्या चित्रपटांनी कमाईच्या बाबतीत आश्चर्यकारक कामगिरी केली. जगभरातील लोक या चित्रपटांचे चाहते झाले आहेत. RRR ने जगभरात 1000 कोटींहून अधिक कमाई केली आहे, तर 'KGF Chapter 2' देखील वेगाने 1000 कोटींकडे वाटचाल करत आहे. (Ajay Devgn vs Sudeep)

सुदीपचे हिंदी चित्रपट…

अजय देवगणच्या प्रतिक्रियेला किच्चा सुदीप काय प्रत्युत्तर देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुदीपने स्वतः अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने फूंक, रन, फूंक 2, रक्तचरित्र आणि दबंग 3 मध्ये काम केले आहे. 2019 मध्ये दबंग 3 रिलीज झाला होता ज्यामध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत होता आणि सुदीप त्यात खलनायकाच्या भूमिकेत होता. आता तो येणाऱ्या काळात हिंदी चित्रपटात काम करतो का पाहण्यासारखे आहे. (Ajay Devgn vs Sudeep)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news