Aged Players In T20 World Cup : ‘या’ खेळाडूंचा असणार अखेरचा विश्वचषक, वर्ल्डकपमध्ये करणार दमदार कामगिरी?

Aged players in T20 World Cup
Aged players in T20 World Cup
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : एका आठवड्यानंतर टी-२० २०२२ च्या विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. १६ ऑक्टोंबर पासून टी-२० विश्वचषकाला सुरूवात होणार होईल. भारतीय संघाची विश्वचषकातील पहिली लढत पाकिस्तानविरुद्ध असणार आहे. हा सामना २३ ऑक्टोंबरला खेळवला जाणार आहे. दरम्यान, २०२२ चा हा विश्वचषक काही खेळाडूंसाठी अखेरचा विश्वचषक ठरू शकतो. (Aged Players In T20 World Cup)

दिनेश कार्तिक, मोहम्मद नबी, डेव्हिड वॉर्नर, शकिब अल हसन आणि मार्टिन गुप्टील या खेळाडूंच्या करियरचा काळ फार मोठा राहिला आहे. त्यामुळे या विश्वचषकात यांची कामगिरी कशी राहिल, याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. वय हे फक्त एक आकडा आहे, तुमच्याकडे प्रतिभा असेल तर तुम्हाला कोणत्याही संघात स्थान मिळू शकते, असे या खेळाडूंनी म्हटले आहे. टी-२० विश्वचषकात खेळणाऱ्या अनुभवी आणि वयस्कर खेळाडूंविषयी जाणून घेऊया… (Aged Players In T20 World Cup)

दिनेश कार्तिक : ३७ वय असलेला दिनेश कार्तिक हा भारताकडून टी-२० विश्वचषक खेळणारा सर्वांत वयस्कर खेळाडू आहे. भारतीय संघात दिनेश कार्तिक शिवाय कर्णधार रोहित शर्माच असा खेळाडू आहे ज्याने २००७ चा टी-२० विश्वचषक खेळला आहे. कार्तिकने भारताकडून ५६ टी-२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ६७२ धावा काढल्या आहेत. विश्वचषकात भारताकडून अंतिम षटकांत फटकेबाजी करण्याची जबाबदारी अनुभवी कार्तिकवर असणार आहे. (Aged Players In T20 World Cup)

मोहम्मद नबी : अफगानिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी हा ३७ वर्षांचा आहे. अफगानिस्तानच्या संघातील दुसरा वयस्कर खेळाडू नजीबुल्लाह जादरान हा नबीपेक्षा ८ वर्षांनी लहान आहे. कर्णधार मोहम्मद नबीने १०१ टी-२० सामने खेळले आहेत. टी-२० सामन्यांमध्ये त्याने १४० स्ट्राईक रेटने १६६९ धावा काढल्या आहेत. तर ८३ विकेट्सही पटकावल्या आहेत. (Aged Players In T20 World Cup)

डेव्हिड वॉर्नर : जवळपास ३६ वर्षांचा असणारा आक्रमक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाकडून खेळणारा सर्वांत वयस्कर खेळाडू आहे. २०२१ मध्ये खेळवल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकात तो 'प्लेयर ऑफ द टुर्नामेंट' ठरला होता. आगामी विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळवला जाणार असल्याने डेव्हिड वॉर्नर आक्रमक फटकेबाजी करू शकतो, असे बोलले जात आहे.

मार्टीन गुप्टील : न्युजीलंडच्या संघाकडून ३६ वर्षाय मार्टिन गुप्टीलला संधी मिळाली आहे. गुप्टीलला ऑस्ट्रेलियाच्या मैदानांवर खेळण्याचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे मार्टिन गुप्टीलची विश्वचषकातील कामगिरी कशी असेल, याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. (Aged Players In T20 World Cup)

हेही वाचंलत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news