

बीड: पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व खासदार शरद पवार यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडला सभा घेणार असे निश्चित झाले होते. यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी बीडमधील भव्य अशा छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगणावर पाहणीही केली. परंतु शनिवारी (दि.१९) सकाळी या सभेबाबत संभ्रम निर्माण करणारी माहिती पुढे येत होती. यावर आता खुद्द कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनीच स्पष्टीकरण दिले असून रविवारी (दि. २७) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सभा होणारच असून याबाबत कोणताही संभ्रम नसल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. (Beed NCP)
हेही वाचा