

बीड, पुढारी वृत्तसेवा : खासदार शरद पवार यांची आज दुपारी बीडमध्ये जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर भव्य दिव्स असा मंडप उभारण्यात आला आहे. या सभेसाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
खासदार शरद पवार हे संभाजीनगर येथून निघून गेवराई येथे थांबणार असून या ठिकाणी शिवसेनेचे नेते माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. तेथून खासदार पवार हे बिडकडे रवाना होणार असून बीड बायपास वरील चौकातून सभासदापर्यंत रॅली आयोजित करण्यात आली आहे. सभे करता राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असून यावेळी धनंजय मुंडे यांच्या गटातील तसेच बी आर एस मधील काही नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास सोलापूर -धुळे महामार्गावर बीड शहरामध्ये असलेल्या महालक्ष्मी चौकात पोहोचतील. तेथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित मोटरसायकल रॅली द्वारे सभेच्या ठिकाणी पोहोचणार आहेत. या रॅलीमध्ये शेकडो लोक सहभागी होण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने वाहतुकीचे नियोजन केले आहे.