

पुढारी ऑनलाईन डेस्क ; आदिपुरुषनंतर दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणखी एक धमाकेदार आगामी 'सालार' ( Salaar ) चित्रपट घेवून येत आहे. KGF दिग्दर्शक प्रशांत नील यांनीच या चित्रपटाची निर्मिती केली आहे. काही महिन्यांपूर्वी चित्रपटातील प्रभासचा लूक शेअर करण्यात आल्यानंतर सध्या आणखी एका कलाकारांचा नवा लूक समोर आलाय.
अभिनेता प्रभासचा गेल्या काही दिवसापूर्वी 'सालार' ( Salaar ) चित्रपटातील फर्स्ट लूक समोर आला होता. यानंतर सध्या निर्मात्यांनी मल्याळम अभिनेता पृथ्वीराज सुकूमारनचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. यात कपाळावर टिळा, गळ्यात माळा आणि नाकात- कानात बाली अशा वेशभूषेत पृथ्वीराज दिसत आहे. पृथ्वीराज सुकूमारन यांचा आज ४० वा वाढदिवसाच्या निमित्ताने हा लूक निर्मात्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या चित्रपटात पृथ्वीराजने वर्धराज मन्नार या भूमिका साकारली आहे. पृथ्वीराजच्या लूकमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
'सालार' या चित्रपटात प्रभास आणि पृथ्वीराज दोघेजण मुख्य भूमिका साकारणार आहेत. प्रभासचा हा चित्रपट KGF युनिव्हर्सशी जोडला जाणार आहे. 'सालार' हा चित्रपट २८ सप्टेंबर २०२३ चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.
हेही वाचलंत का?