Ajit Pawar : …अखेर अजित पवार माळेगावला आलेच नाहीत

Ajit Pawar : …अखेर अजित पवार माळेगावला आलेच नाहीत

Published on

शिवनगर: पुढारी वृत्तसेवा :  माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाची मोळी टाकून सुरुवात करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार येणार नसल्याचे कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात आले. अजित पवारांच्या उपस्थितीला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध केला होता.त्याअनुषंगाने अजित पवार यांनी कार्यक्रमाला येण्याचे टाळले,मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या समाज बांधावाना मात्र अद्याप या बाबत शंका असल्याने मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव कार्यक्रमाच्या ठिकाणी ठिय्या देऊन बसले आहेत.मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना जोपर्यंत कारखाना प्रशासनाकडून अधिकृत रीत्या सगातले जात नाही तोपर्यंत येथून जाणार नसल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news