

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम अफगाणिस्तान पुन्हा एकदा रविवारी (दि.१५) सकाळी भूकंपाने हादरला. येथे भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.3 इतकी मोजली गेली आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, गेल्या काही आठवड्यांत झालेल्या जोरदार भूकंपानंतर हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे आणि संपूर्ण गावे उद्ध्वस्त झाली आहेत.हेरात शहरापासून 33 किलोमीटर अंतरावर भूकंप झाल्याचे यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने सांगितले.
विशेष म्हणजे या आठवड्यात तिसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, शुक्रवारी अफगाणिस्तानमध्ये 4.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. सकाळी 6:39 वाजता (IST) देशात 50 किलोमीटर खोलीवर भूकंपाचे धक्के जाणवले.
यापूर्वी 11 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानमध्ये 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. भूकंपाचा केंद्रबिंदू 10 किलोमीटर खोलीवर होता. यामुळे हेरात प्रांतात 4000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि हजारो निवासी इमारती उद्ध्वस्त झाल्या. हेरात आणि आजूबाजूचा परिसरही शनिवारी 6.3 तीव्रतेचा भूकंप आणि त्याच्या शक्तिशाली आफ्टरशॉकने हादरला.
हेही वाचा