Aero India 2023 : ‘एअरो इंडिया’ हा केवळ शो नाही तर भारताची ताकद : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Aero India 2023 : ‘एअरो इंडिया’ हा केवळ शो नाही तर भारताची ताकद : पंतप्रधान नरेंद्र मोदी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : एअरो इंडिया हे भारताच्या विस्तारित क्षमतेचे उदाहरण असून 100 राष्ट्रांच्या उपस्थितीमुळे भारतावर जगाचा विश्वास वाढल्याचे दिसून येते. एअरो इंडिया हा केवळ शो नाही तर भारताची ताकद आहे. आज भारत ही जगातील संरक्षण कंपन्यांची फक्त बाजारपेठ नाही तर संरक्षण क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या देशांचा भागीदार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी यांनी आज (दि.१३) बंगळूरमधील येलाहंका येथील एअरफोर्स स्टेशन येथे 'एरो इंडिया 2023' च्या 14 व्या आवृत्तीचे उद्घाटन केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी एरो इंडिया 2023 वर टपाल तिकीटही जारी केले. हा शो १७ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, 21व्या शतकातील नवा भारत आता कोणतीही संधी गमावणार नाही. आम्ही प्रत्येक क्षेत्रात क्रांती आणत आहोत. अनेक दशकांपासून संरक्षणाचा सर्वात मोठा आयातदार असलेला देश आता निर्यात करत आहे. 75 देशांना संरक्षण उपकरणे पुरवत आहे. गेल्या काही वर्षांत देशाने धारणे बदलली आहे. आज केवळ हा शो नाही तर भारताची ताकद आहे. हे भारतीय संरक्षण उद्योगाची व्याप्ती आणि आत्मविश्वास यावर लक्ष केंद्रित करते, असे त्यांनी म्हटलं आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, जागतिक आकाशात भारत हा एक असा तारा म्हणून उदयास आला आहे जो केवळ चमकत नाही तर इतरांनाही आपल्या तेजाने प्रकाशित करत आहे. देशातील संरक्षण क्षेत्राने काही वर्षांत खूप मोठा पल्ला गाठला आहे. यशाचे अनेक टप्पे पार केले आहेत, जे भविष्यात आधारस्तंभ बनतील. एरो इंडिया हा देखील त्या स्तंभांपैकी एक आहे. यामाध्यमातून भारताची स्वदेशी ताकद दिसेल.

'एरो इंडिया'च्या अधिकृत वेबसाइटनुसार, येलाहंका येथील एअरफोर्स स्टेशनवर होणाऱ्या 'एरो इंडिया शो'मध्ये 109 परदेशींसह 807 प्रदर्शकांनी सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमात 98 देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील. 32 देशांचे संरक्षण मंत्री, 29 देशांचे हवाई दल प्रमुख, जागतिक आणि भारतीय वंशाच्या उपकरण उत्पादकांचे 73 सीईओ सहभागी होतील. या एअर शोमध्ये जगभरातील संरक्षण कंपन्यांची उपकरणे दाखवण्यात येणार आहेत. सुमारे 800 संरक्षण कंपन्या विमान वाहतूक आणि संरक्षण क्षेत्रातील तांत्रिक प्रगती दाखवतील.

'द रनवे टू अ बिलियन अपॉर्च्युनिटीज' ही या कार्यक्रमाची थीम आहे. एअर शोमध्ये विमान वाहतूक क्षेत्रातील भारताचा विकास आणि त्याची संरक्षण क्षमता दाखवण्यात येणार आहे. शोदरम्यान अनेक लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर सादर करणार आहेत. यामध्ये भारताचे हलके लढाऊ विमान तेजस हे आकर्षणाचे केंद्र असेल, असे संरक्षण अधिकार्‍यांनी सांगितले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news