

पुढारी ऑनलाईन डेस्क : राखी सावंत आणि आदिल सध्या खूप चर्चेत आहेत. राखी आपले सर्व अपडेट्स मीडियासमोर व्यक्त करते. राखीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये राखीने मोठा खुलासा केला आहे. राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या कठीन प्रसंगातून जात आहे. काही दिवसांपासून राखीवर दु:खांचा डोंगर कोसळला आहे. तिचा पती आदिल दुर्रानीने तिला धोका दिल्याचे राखीने म्हटले असून तिने आदिलविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यावरून पोलिसांनी कारवाई करत आदिलला ताब्यात घेतले होते. त्यानंतर कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता पुन्हा राखीने मीडियासमोर येऊन नवा खुलासा केला आहे. तिने आता आदिलची गर्लफ्रेंड तनुचे नाव समोर घेतले आहे. (Rakhi Sawant)
राखीने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, आदिल खानचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे. तिने तनुचं नाव सांगितलं होतं. आता राखीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये तिने मोठा खुलासा केला आहे. राखी म्हणत आहे की, तनु प्रेग्नेंट आहे. म्हणून आदिल जेलबाहेर येऊन लग्नदेखील करणार आहे.
राखी सावंतने सांगितलं की, आदिलला जामिन मिळाला नाही. राखी म्हणाली, मी चिंतेत आहे. आधी तो विवाहित असल्याची माहिती आणि आता नवेदिता तनु चंदेल प्रेग्नेंट आहे. आता तो लग्न करणार आहे. तनुने सांगायला हवं की, ती प्रेग्नेंट आहे की नाही. मी मुंबई आणि म्हैसूर पोलिसांचे आभार मानते.