Rasika Sunil : माझ्या नवऱ्याची बायको फेम शनाया अडकली लग्नबेडीत ♥️♥️
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून शनाया अर्थातचं अभिनेत्री रसिका सुनील (Rasika Sunil) घराघरात पोहोचली. तिने मालिका सोडल्यानंतरही तिची लोकप्रियता कायम टिकून राहिलीय. ती परदेशात शिक्षणासाठी निघून गेली. तेथे तिची आदित्य बिलागीसोबत ओळख झाली. मैत्रीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. दरम्यान, तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिच्या या बॉयफ्रेंडविषयी खुलासा केला होता. त्यावेळी रसिका सुनील (Rasika Sunil) लॉस एंजिलिसमध्ये होती. पुढे जाऊन त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. आता दोघांनीही समुद्रकिनारी आदित्य बिलागी सोबत सात फेरे घेतले.
कोण आहे आदित्य?
रसिकाने ज्याच्याशी लग्नगाठ बांधलीय, त्या व्यक्तीचे नाव आहे 'आदित्य बिलागी' आहे. तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तसेच उत्तम डान्सर, कोरीओग्राफर, चित्रकला, मार्शल आर्ट्सचीही त्याला आवड आहे. त्याचे डान्स परफार्मन्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याच्या इन्स्टाग्रामवर डान्सचे काही व्हिडिओज पाहायला मिळतात.
आदित्य-रसिकाचा गोव्याच्या किनाऱ्यावर अगदी थोड्याचं लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पडला. त्यांनी लग्नाचे काही मोजके फोटोज सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी दिली. दोघांना चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छा मिळताहेत. हे लग्न १८ ऑक्टोबरला झाले. पण, लग्नाचा खुलासा त्यांनी ३० ऑक्टोबरला केला.
रसिका सुनील आणि आदित्य बिलागीने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर सप्तपदी घेतानाचा फोटो शेअर केला आहे. हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. या फोटोला कॅप्शन लिहिलीय की, १८ ऑक्टोबर २०२१, बीचवर रस्की-आदिचं लग्न.

