Prajakta Mali : लग्न करणं बंधनकारक आहे का?; प्राजक्ताची पोस्ट चर्चेत

Prajakta Mali
Prajakta Mali
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून चाहत्यांच्या घराघरात पोहोचलेली मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) चर्चेत आली आहे. प्राजक्ता कधी तिच्या नव्या प्रोजेक्ट तर कधी तिच्या रोखठोक बोलल्याने चर्चेत असते. दरम्यान प्राजक्ता अभिनयातून संन्यास घेत असल्याची चर्चा सर्वत्र पसरली होती. मात्र, आता लग्न करणं बंधनकारक आहे काय? या पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी गेल्या दोन दिवसापूर्वी बंगळूर येथील श्री. श्री. रविशंकर यांच्या आश्रमातील सत्संगात सहभागी झाली होती. यावेळी तिने आश्रमातील सत्संगासह विविध कार्यक्रम आणि ध्यानधारणा केली. तसेच श्री. श्री. रविशंकर यांच्या प्रवचनाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमात प्राजक्ताने रविशंकर यांना लग्न करणं बंधनकारक आहे काय? असा प्रश्न विचारल्यानंतर हस्याचा कल्लोळ नागरिकांच्यात पसरला.

प्राजक्ताने ( Prajakta Mali) तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच रविशंकर याच्या कार्यक्रमातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओत ती पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आणि डोक्यावर ओढणी परिधान केली असल्याचे दिसतेय. याशिवाय तिच्या हातात माईक असून तिने यावेळी 'लग्न करणं बंधनकारक आहे काय?' असे म्हटलं आहे. यावर रविशंकर मिश्किलपणे हसतात आणि म्हणातात की, 'हे तुम्ही मला विचारताय, असे असेल तर माझ्या बाजूला आणखी एक खुर्ची ठेवावी लागली असती. तर लग्न करणे हे ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. ज्याला ज्या गोष्टीचा आनंद वाटतो त्याने ती गोष्ट करावी'. असे सांगितल्यानंतर अनेकजण पोट धरून हासू लागले.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये प्राजक्ताने 'I know I know… एव्हाना तुम्ही हा video पाहिला असेल.., पण माझं गुरुदेवांबरोबरचं पहिलं recorded संभाषण माझ्या profile वर असायलाच हवं ना… ?. Also, I just loved his answer. Totally convinced. ♥️'. असे लिहिले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह मराठी कलाकारांनी कॉमेन्टचा पाऊस पाडला आहे. यात 'Single सदा सुखी ❤️?', 'याचा अर्थ असा आहे की, तुम्हाला लग्नच नाही करायच म्हणून हा प्रश्न विचारला?', 'एकदम भारी प्रश्न होता ?', 'तुझी खुशी कशात आहे, ते बघ', 'खरच खूप सुंदर उत्तर', '?❤️wa wa?', 'तुला नाही करायच तर नको करू येडे'. यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत. या व्हिडिओला आतापर्यत २० हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. याआधी प्राजक्ताची संन्यास घेतला असल्याची पोस्ट चर्चेत आली होती.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news