Malaika-Arjun
Malaika-Arjun

Malaika-Arjun Wed : मलायका-अर्जुनचं नातं पुढे गेलंय! लग्नाच्या रंगल्या चर्चा

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क

मलायका अरोरा-अर्जुन कपूर कधीही त्यांच्या नात्याबद्दल बोलण्यास मागे पुढे पाहत नाहीत. वयातील अंतरामुळे त्यांना खूप ट्रोल केलं जातं. पण तो नेहमीच ट्रोलर्सपासून दूर राहतो आणि त्यांच्या लव्ह लाईफविषयी मनमोकळेपणाने बोलतो. मलायका ही आधी सलमान खानचा भाऊ अरबाज खानची पत्नी होती, अरबाजपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका आणि अर्जुनचे नाते सुरु झाले. अभिनेत्रीने नुकतेच अर्जुनसोबतच्या तिच्या भविष्यातील योजनांबद्दल सांगितले आहे. (Malaika-Arjun Wed) त्यामुळे दोघे लग्न करणार अशल्याच्या चर्चा होताना दिसताहेत. (Malaika-Arjun Wed)

मलायका आणि अर्जुन त्यांच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत असतात. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मलायकाने सांगितले की, "मी अनुभव घेत आहे की, आम्ही कोणत्या ठिकाणी आहोत. आणि पुढे काय भविष्य आहे. यावर आम्ही विचार करत आहोत. खूप साऱ्या गोष्टींवर आमची चर्चा सुरु आहे. आम्ही एकसारख्या जहाजावर आहोत, एक सारखे विचार आणि आयडियासोबत."

अर्जुन कपूर विषयी बोलताना, मलायका म्हणाली, "आम्ही एक परिपक्व अवस्थेत आहोत. जिथे आता आणखी शोधाची अपेक्षा आहे. परंतु, आम्ही एकत्र भविष्य पाहणं पसंत करु. आणि पाहू की, आमचे नाते कुठल्या पातळीवर जाईल. आम्ही याविषयी हसतो आणि विनोद करतो. पण, आम्ही खूप गंभीर आहोत.

मलायका अरोरा म्हणाली- मी खूप आनंदी आणि सकारात्मक आहे. अर्जुनने मला तो आत्मविश्वास आणि खात्री दिली आहे. आम्ही या दोन्ही मार्गांनी चालतोय. मला नाही वाटत की, आम्हाला एकावेळी सर्व कार्ड खेळायला हवेत. आम्ही आतादेखील आमच्या जीवनातील प्रत्येक दिवस प्रेमाने घालवतो. मी नेहमी त्याला म्हणते की, मला तुझ्यासोबत म्हातारी व्हायचं आहे. आम्ही बाकी सर्व विचार करू. पण, मला माहितीये की तो तो माझा माणूस (my man) आहे.

मलायकाने १९९८ मध्ये अरबाजसोबत लग्न केले होते. जवळपास दोन दशकांच्या लग्नानंतर या जोडप्याने घटस्फोटाची घोषणा केली होती. त्यांना एक मुलगा अरहान खान आहे.

काही काळापूर्वी अर्जुन आणि मलायकाचे ब्रेकअप झाल्याची अफवा पसरली होती. पण अर्जुनने इन्स्टाग्राम पोस्ट करून ही केवळ अफवा असल्याचे सांगितले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news