Kiara Advani
Kiara Advani

Kiara Advani : सिद्धार्थला सोडून एकटीच हनिमूनला?…; कियाराचा बॉडीकॉन टॉप अन् स्कर्ट

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा या क्यूट कपलला कोण ओळखत नाही. गेल्या फेब्रुवारी महिन्यात दोघांचा धुमधडाक्यात लग्न सोहळा पार पडला. यानंतर मुंबईतील पार्टीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर दोघेजण अनेक वेळा डिनर डेट असो वा निसर्गरम्य ठिकाण असो एकमेंकसोबत स्पॉट झाले आहेत. मात्र, यावेळी कियाराने एकटीचे बीचवरील फोटो शेअर केल्याने चाहत्यांनी 'एकटीच हनिमूनला गेली आहेस का? सिद्धार्थ कोठे आहे..' असा सवाल उपस्थित केला आहे.

अभिनेत्री कियारा अडवाणीने ( Kiara Advani ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर बीचवरील फोटो शेअर केले आहे. फोटोमध्ये ती सुट्ट्याचा आनंद घेताना दिसली आहे. यावेळी कियारा व्हाईट कलरच्या स्लीवलेस बॉडीकॉन टॉप आणि थाय-हाय स्लिट स्कर्ट परिधान केलं आहे. तिने एकापेक्षा एक हॉट आणि किलर पोझ दिल्या आहेत. मात्र, कियारा एकटीच बीचवर असल्याने चाहत्यांनी सिद्धार्थची आठवण काढली आहे. या फोटोला तिने 'Beach please ?‍♀️??☀️'. अशी कॅप्शन लिहिली आहे.

कियाराचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका युजर्सने 'तू एकटीच हनिमूनला गेला आहेस का? सिद्धार्थ कोठे आहे?', 'तुला पाहतो तेव्हा मला सिद्धार्थ किती भाग्यवान आहे असे वाटते.', तर दुसऱ्या एकाने 'सिद्धार्थ कुठे आहे? बीचवर फिरायला एकटीच आली आहेस?' असे म्हटलं आहे. आतापर्यंत या फोटोला ३० लाखांहून अधिक जणांनी लाईक केले आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा यांचे लग्न गेल्या फेब्रुवारी महिन्यात जैसलमेर येथील सुर्यगढ पॅलेसमध्ये मोठ्या उत्साहात पार पडले. यानंतर मुंबईत रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. याशिवाय कियारा तिचे अनेक जीवनातील अपडेट देऊन सोशल मीडियावर सक्रिय असते.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news