mithun chakraborty
mithun chakraborty

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती आयसीयुतून बाहेर; पहिला व्हिडिओ समोर

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता मिथून चक्रवर्ती यांना आयसीयूमधून बाहेर आणल्याची माहिती समोर आलीय. (Mithun Chakraborty)  तब्येत बिघडल्याने त्यांना कोलकातामधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. रिपोर्टनुसार, त्यांची प्रकृती आता स्थिर असून तब्येतीत सुधारणा पाहायला मिळत आहे. (Mithun Chakraborty)

संबंधित बातम्या –

दरम्यान, माजी क्रिकेटर सौरव गांगुली, पश्चिम बंगाल भाजप प्रमुख सुकांत मुजूमदार यांनी त्यांची भेट घेतली. मिथुन चक्रवर्ती बंगाली चित्रपट शास्त्रीचे शूटिंग करत होते. या चित्रपटातील त्यांची सहकलाकार देबाश्री रॉयने सांगितले की, आता त्यांची तब्येत ठिक आहे, त्यांना आयसीयूतून बाहेर रिकव्हरी वॉर्डमध्ये आणण्यात आले आहे.

देबाश्रीने एका चॅनेलला दिलेल्या बातचीतमध्ये मिथून यांची शूगर लेव्हल पूर्ण कमी झाली होती. आता त्यांना खूप अस्वस्थ वाटत होतं. देबाश्रीने सांगितले की, चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शक पथिकृत बासु म्हणाले, मिथुन दा लवकरच चित्रपटाचे शूटिंग करू शकतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news