actor Don Murray
actor Don Murray

Don Murray : ऑस्कर नामांकित अभिनेता डॉन मरे काळाच्या पडद्याआड

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बस स्टॉप'चा ऑस्कर-नामांकित हॉलिवूड अभिनेता डॉन मरे यांचे निधन झाले आहे. (Don Murray) 'बस स्टॉप' आणि 'नॉट्स लँडिंग' या चित्रपटांतील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले हॉलिवूड अभिनेते डॉन मरे यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. 'अ हॅटफुल ऑफ रेन', 'द हूडलम प्रीस्ट' आणि 'ॲडव्हाइस अँड कन्सेंट' या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारली होती. (Don Murray)

मरे यांचा मुलगा क्रिस्टोफरने एका इंग्रजी वृत्तपत्राला त्याच्या वडिलांच्या मृत्यूची माहिती दिली.

अ हॅटफुल ऑफ रेन (१९५७), द हूडलम प्रिस्ट (१९६१) आणि ॲडव्हाईस अँड कन्सेंट (१९६२) यांसारख्या गंभीर चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय साकारला होता. वयाच्या २६ व्या वर्षी त्यांनी पहिला चित्रपट केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news