Thalapathy Vijay : लोकप्रिय स्टार थलापती विजयचा राजकारणात प्रवेश, पक्षाच्या नावाचीही घोषणा

vijay thalapathy
vijay thalapathy
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या दमदार भूमिकांनी प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या विजय थलापतीने राजकारणात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्याने राजकारणात पाऊल ठेवलं आहे. त्याने आपल्या पक्षाच्या नावाची घोषणा देखील केली आहे. विजयने आपल्या पक्षाचे नाव तमिलागा वेट्ट्री कजगम असे ठेवले आहे. (Thalapathy Vijay ) त्याचसोबत विजयने एक स्टेटमेंट जाहिर केलं आहे. त्याने सांगितलं आहे की, तो २०२४ ची लोकसभेची निवडणूक लढणार नाही. आणि या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला पाठिंबा देणार नाही. आम्ही हा निर्णय सामान्य आणि कार्यकारी परिषदेच्या बैठकीसाठी घेतला आहे. (Thalapathy Vijay )

संबंधित बातम्या – 

साऊथचा सुपरस्टार

साऊथमध्ये विजयची एक वेगळी ओळख आहे. विजय यांच्या कोणत्याही चित्रपटाबद्दल फ्रन्समध्ये मोठी क्रेझ असते. आता विजयने आपला नवा चित्रपट GOAT ची घोषणा केली होती. यामध्ये त्याच्या सोबत प्रभुदेवा, प्रशांत आणि अजमल यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे नवे पोस्टर विजयने रिलीज केले होते.

विजयने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलंय की-आम्ही आमची पार्टी 'तमिलागा वेट्ट्री कजगम' रजिस्टर करण्यासाठी आज निवडणूक आयोगात अर्ज करत आहोत. आमचे लक्ष्य आगामी २०२६ विधानसभा निवडणूक लढणे आणि जिंकणे आहे. सोबतच मूलभूत राजकीय बदल घडवून आणणे हेच जनतेला हवे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news