सुरजागड लोहखाणीत अपघात; अभियंत्यासह ३ जणांचा मृत्यू

सुरजागड लोहखाणीत अपघात; अभियंत्यासह ३ जणांचा मृत्यू

Published on

गडचिरोली, पुढारी वृत्‍तसेवा : एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखाणीत लोहखनिजाचे उत्खनन करत असताना मोठा ट्रक बोलेरो कम्पेर वाहनावर कोसळल्याने तीन जण ठार झाले. ही घटना रविवारी (ता.६) संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. यात एका अभियंत्याचाही समावेश आहे.

सोनल रामगिरवार (२६) रा. नागेपल्ली, ता. अहेरी, असे मृत अभियंत्याचे नाव असून, मृतांमध्ये हरियाणा राज्यातील दोन मजुरांचाही समावेश आहे. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

मागील दोन वर्षांपासून सुरजागड पहाडावर लायड मेटल्स कंपनीतर्फे लोह खनिजाचे उत्खनन केले जात आहे. रविवारी संध्याकाळी उत्खनन करीत असताना लोहखनिज भरलेला मोठा ट्रक खाली असलेल्या बोलेरो कम्पेर वाहनावर कोसळला. यात वाहनाजवळ असलेले अभियंता सोनल रामगिरवार व अन्य दोन मजूर ठार झाले. एटापल्ली पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.

.हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news